डॉ. हेमंत मांजरेकर यांना लेजेंड ऑफ मेडिसिन पुरस्कार

    08-Jul-2024
Total Views |
 
 
hem
पुणे/नवी दिल्ली, 7 जुलै (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
पुण्यातील प्रसिद्ध डॉ. हेमंत मांजरेकर यांना त्यांच्या मेडिकल क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल आणि गरजूंच्या सेवेसाठी टाइम्स नाऊचा ‌‘लेजेंड ऑफ मेडिसीन' पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीत ताज पॅलेसमध्ये पार पडलेल्या टाइम्स नाऊ डॉक्टर्स-डे कॉन्क्लेव्ह या शानदार कार्यक्रमात सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी देशभरातील अनेक प्रसिद्ध डॉक्टर आणि मान्यवर उपस्थित होते. मेडिकलच्या क्षेत्रातील कार्याबाबद्दल अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे.
 
मितभाषी म्हणून ओळखले जाणारे डॉ. मांजरेकर गेली 40 वर्षे डॉक्टर म्हणून कार्यरत असून, त्यांनी अनेक गरजूंना मदत केली आहे; तसेच श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्याचे काम ते अविरतपणे करीत आहेत. डॉ. हेमंत मांजरेकर यांना लेजेंड ऑफ मेडिसिन पुरस्कार ताज पॅलेस येथे आयोजित टाइम्स नाऊ डॉक्टर्स-डे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात केंद्रीय सायन्स अँड़ टेक्नॉलॉजी मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते डॉ. हेमंत मांजरेकर यांना लेजेंड ऑफ मेडिसिन पुरस्कार प्रदान करण्यात आला.