निर्णय घेण्याची वेळ काेणती?

    07-Jul-2024
Total Views |
 
 

decision 
 
आपल्याला वाटते की, आपल्याला निर्णय घ्यावाच लागला नसता तर बरे झाले असते वा आणखी थाेडा वेळ मिळाला असता तर बरे झाले असते. परंतु...‘निर्णय घेण्याची वेळ आपण निवडू शकत नाही. आम्हाला काेणत्याही परिस्थितीत स्वत:ला तयार करून निर्णय घ्यायचा असताे.’ असे मत आहे रीता वाॅटसनचे. ती येल विद्यापीठाच्या सायकियाट्री विभागात पाॅलिसी अँड एज्युकेशनची डायरे्नटर हाेती व सध्या फेलाे म्हणून आहे. तिचे प्रसिद्ध पुस्तक आहे ‘द आर्ट ऑफ डिसीजन मेकिंग : ट्वेंटी विनिंग स्ट्रॅटेजीज फाॅर वूमन’ निर्णय घेणे साेपे नसते.आपण जेव्हा त्रस्त असताे तेव्हा तर निर्णय घेणे खूपच कठीण हाेऊन जाते. आपण त्रस्त असताे याचा हा अर्थ नव्हे की, आपण निर्णय घेणे बंद करताे. काही वेळासाठी आपण आपले निर्णय टाळू शकताे.तेही प्रत्येक बाबतीत नाही, पण जीवन जगायचे असेल तर निर्णय तर घ्यावेच लागणार. बऱ्याच वेळा आपले मन अजिबात चांगले नसताना निर्णय घ्यावे लागतात.
 
मन जेव्हा चांगले नसते तेव्हा काहीही करणे कठीण हाेत असते. निर्णय घेणे तर जास्तच कठीण हाेते.खरेतर आपण नव्हे तर काळ ठरवत असताे निर्णय घेण्याची वेळ.वास्तविक त्याच वेळी आपली परीक्षा असते. आपल्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाची ओळखही तेव्हाच हाेत असते. त्या त्रासाच्या काळात आपण कसे निर्णय घेत असताे त्यावर आपले जीवन ठरत असते.त्यापासून आपण वाचू शकत नाही.त्रासाच्या त्या परिस्थितीत आपण स्वत:ला खंगाळायचे असते.आपण उखडलेले असताे, पण आपल्याला उभे राहायचे असते.सर्व प्रकारच्या भावना आपल्याला हादरवत असतात. त्या भावनांवर आपल्याला ताबा मिळवायचा असताे. हेच सर्वांत कठीण काम असते, पण ते करावेच लागते.