प्रत्येकाला माहीत हव्यात अशा गाेष्टी

    06-Jul-2024
Total Views |
 

Money 
 
1) पैशाची बचत कशी करावी आणि ते दीर्घकाळासाठी चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये आणि म्युच्युअल ंडात गुंतवण्याची कला.
 
2) काहीही झाले तरी तुमचे आईवडील तुमच्या पाठिशी उभे राहतात. तुमच्या बाॅय्रेंड/गर्ल्रेंडबाबत हे लागू पडत नाही.
 
3) कुणीही तुमचा बेस्ट ्रेंड नसताे. जाेपर्यंत त्यांना किंवा त्यांच्या करिअरला तुम्ही संभाव्या धाेका ठरत नसता ताेपर्यंत तुम्ही त्याचे बेस्ट ्रेंड असता. एकदा का तुम्ही प्रगती केली की कुणीही तुमचा बेस्ट ्रेंड नसताे.4) तुम्ही कुणालाही त्याचा खरा पगार विचारू नका. ताे कधीच खरा आकडा सांगणार नसताे.
 
5) स्वतःचे स्वतःचे स्टार्ट अप सुरु करणे श्रेयस्कर असते. पण ते करण्यापूर्वी तुम्हांला कराव्या लागणाऱ्या धडपडीसाठी, संघर्षासाठी हाती पैसा जमवून ठेवा.
 
6) स्वतःचे न्यूड ाेटाे कधीही शेअर करू नका. तुम्ही स्वतःचे न्यूड ाेटाे काढले तरी ते कुणालाही पाठवू नका. अगदी जवळच्या विश्वासू व्यक्तीलाही पाठवू नका.
 
7) एखादा छंद विकसित करा. त्यात दिवसेंदिवस प्रगती करा.
 
8) कधीतरी मद्यपान चालू शकते पण आयुष्यात कधीही धूम्रपान करू नका. तुम्हांला त्यातील ऐट, मर्दानगी आकर्षित करेल पण या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत. धूम्रपानामुळे तुम्ही कुठल्यातरी रुग्णालयात मृत्यूशय्येवर पडला असाल तेव्हा हे तुम्हांला कळेल.