पाठीच्या कण्याच्या समस्येवर तणावाचेही वाढते ओझे

    03-Jul-2024
Total Views |
 

health 
 
द ओहियाे स्टेट युनिव्हर्सिटीच्या स्पाइन सेंटरच्या अध्ययनानुसार चुकीच्या पद्धतीने उठणे-बसणे वा उशिरापर्यंत स्क्रीनसमाेर बसून काम करणे पाठीच्या कण्याच्या समस्यांचे एक माेठे कारण आहे.अशा वेळी कणा एका बाजूला झुकलेला वा तिर्नया अवस्थेत राहताे. ज्यामुळे कण्याचे स्वाभाविकपणे फिरणे प्रभावित हाेते.खराब जीवनशैलीही कण्याच्या समस्यांचे एक माेठे कारण आहे.लठ्ठपणा व तणाव वाढू देऊ नये महर्षि युराेपियन रिसर्च युनिव्हर्सिटी नेदरलँडनुसार लठ्ठपणा व तणाव पाठीच्या कण्याच्या व सांध्यांच्या आराेग्यावर दुष्परिणाम करताे. यामुळे हाडांच्या व सांध्यांच्या आकारात विकृती येऊ लागते.
 
अलाइनमेंट बिघडू लागते. वेदनेची तीव्रता वाढते. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या संशाेधकांच्या मते पाठीच्या कण्याच्या त्रासांशी झुंजत असलेल्या सुमार80 टक्के व्य्नती कित्येक प्रकारच्या मानसिक समस्यांनी पीडित आहेत. महर्षी युराेपियन रिसर्च युनिव्हर्सिटी नेदरलँडनुसार मज्जासंस्थेवर आणि पाठीच्या कण्याच्या हाडांवर तणाव दुष्परिणाम करताे. तणाव नियंत्रित करण्यासाठी किमान 7 ते 8 तासांची झाेप हवी असते.
 
खाणे-पिणे जपावे समताेल आहार : व्हिटॅमिन व मॅग्नेशियमने भरपूर पालेभाज्या खा. जंक फूड व चरबीयुक्त पदार्थ टाळावेत.
 
पुरेसे पाणी प्यावे : पाण्याच्या कमतरतेमुळे कण्यातील मण्नयांवर परिणाम हाेताे. कंबर व मान दुखणे व आखडणे वाढते.
 
डेअरी उत्पादनांचे सेवन : दूध, दही, पनीर, लाेणी, ताकात असलेले कॅल्शियम, प्राेटीन व इतर पाैष्टिक घटक हाडांसाठी विशेष गरजेचे असतात. विशेषकरून मुलांना अवश्य द्यावे.
 
ओमेगा 3 व व्हिटॅमिन डी : यांच्या कमतरतेमुळे मज्जासंस्थेवर दुष्परिणाम हाेताे.सूर्यप्रकाश आणि उन्हाव्यतिरिक्त अक्राेड, माशाचे तेल घेणे फायदेशीर असते. गरज पडल्यास सप्लीमेंट्सही घ्यावे लागू शकते.