नाॅनस्टिक भांड्यांमधून अमेरिकेत ‘टेफ्लाॅन फ्लू’ पसरताेय; 250 लाेकांना लागण झाली

29 Jul 2024 22:27:33
 
 


teflon
 
 
काळानुरूप स्वयंपाकाच्या पद्धती खूप बदलल्या आहेत. एकेकाळी चुलीवर शिजवलेले अन्न खाल्ले जात असताना, आज गॅस आणि इंडक्शनने आपल्या स्वयंपाकघराचा ताबा घेतला आहे. अगदी वापरायची भांडी आणि अन्न पॅकिंगच्या पद्धतीही बदलल्या आहेत.
यातीलच एक गाेष्टी म्हणजे नाॅनस्टिक पॅनमध्ये स्वयंपाक करणे. तर किचनमध्ये स्वयंपाक करत असताना अनेकदा तव्यातून धूर निघताे. पण तुम्ही कधी विचार केला आहे, का की हा धूर तुम्हाला आजारी देखील बनवू शकताे.विश्वास बसत नाही ना, मात्र हे खरे आहे. अमेरिकेत एक नवीन राेग पसरत आहे, ज्याला टेफ्लाॅन फ्लू किंवा पाॅलिमर फ्यूम फिव्हर असे नाव देण्यात आले आहे. 250 हून अधिक अमेरिकन या आजाराचे बळी आहेत.टेफ्लाॅन फ्लूचा प्रसार घरात ठेवलेल्या भांड्यांमुळे हाेताे.
 
विशेषत: नाॅनस्टिक भांडी या फ्लूला कारणीभूत ठरत आहेत. नाॅनस्टिक भांडी जास्त गरम केल्यावर त्यातून निघणारा धूर शरीरात जाताे आणि टेफ्लाॅन फ्लूला जन्म देताे. कधी कधी नाॅनस्टिक भांड्यांवरील लेप निघताे आणि अन्नात मिसळताे. त्यानंतर ताे शरीरात प्रवेश करून माेठा धाेका निर्माण करू शकताे. अहवालानुसार, यामुळे फुप्फुसात जळजळ हाेऊ शकते आणि फ्लूसारखी लक्षणे दिसू शकतात. टेफ्लाॅन फ्लूचे परिणाम थाेड्याच वेळात शरीरावर दिसू लागतात. तर टेफ्लाॅन एक प्रकारचे कृत्रिम रसायन आहे. कार्बन आणि फ्लाेरिनपासून बनलेल्या या रसायनाला पाॅलिटेट्राफ्लुराेइथिलीन  म्हणतात.नाॅनस्टिक पॅनमध्ये स्वयंपाक करणे खूप साेपे आहे, परंतु अशी भांडी 500 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त गरम करणे महागात ठरू शकते. यामुळे टेफ्लाॅन वितळते आणि अन्नामध्ये विरघळते.
Powered By Sangraha 9.0