मुलींनी आपला प्रेमी काेण आहे, याचा विचार करावा

    29-Jul-2024
Total Views |
 
 

love 
 
सर्वप्रथम ठरवा : आपण आपल्या प्रियकराची फकत गर्लफ्रेंड वा लाइफ पार्टनर हाेऊ इच्छिता हे ठरवा. त्यानंतर त्याचे मत घ्या. ताे आपल्याला फक्त गर्लफ्रेंडच समजत असेल तर त्याचे आपल्यावर प्रेम नसून ताे फक्त आपला वापर करू इच्छित आहेत असे समजा व त्याला साेडा.
 
बाॅयफ्रेंड लव्हर हाेताे तेव्हा : जेव्हा आपण आपल्या मित्र वा बाॅयफ्रेंडकडून जास्त केअरिंग व प्रेम मिळवू लागला तर ताे आपला लव्हर हाेण्याचा प्रयत्न करीत आहे असे समजा. अशावेळी सर्वप्रथम त्याच्याबद्दलचा अ‍ॅप्राेच बदला. हे थाेडे कठीण असू शकते. कदाचित दहापैकी आपल्या आठ गाेष्टी ताे हल्नया प्रकारे घेईल.या गाेष्टी व्यक्तिमत्वावर अवलंबून असतात.ही गाेष्ट साेपी करण्यासाठी येथे काही टिप्स देत आहाेत.
 
अ‍ॅट्रॅ्निटव्ह पर्सनॅलिटी : सर्वप्रथम आपण आपला फिजिकल अ‍ॅपीयरन्स सुधारा. वर्कआउट,पाॅश्चर, बाॅडी लँग्वेज व चेहऱ्याकडे जास्त लक्ष द्या. त्याला भेटायला जाताना उत्तम ड्रेसअप हाेऊन जा.अप-टू-डेट व फिट राहा.
 
पर्सनल कम्युनिकेशन : आपण त्याला आपले बनवू इच्छित असाल तर एकांतात त्याच्याशी पर्सनल बाेला. यावेळी आपल्या ए्नस-बाॅयफ्रेंडविषयी चुकूनही बाेलू नका. तसेच महिलांवर कमेंट करण्यापूर्वी दाेनदा विचार करा.
 
चेंज इन परसेप्शन : जर त्याने आपल्याविषयी वेगळा विचार करावा असे वाटत असेल तर सर्वप्रथम आपला दृष्टिकाेन बदला. आपल्याविषयी त्याचा दृष्टिकाेन बदलू इच्छित असाल तर त्यासाठी याेग्य वातावरण तयार करा. जर आपण प्रेमात पूर्ण बुडाला असाल तर येथे हुशारीने काम करण्याची गरज असते. डेटवर उगाचच एखाद्या ठिकाणी भटकण्यापेक्षा त्याच्यासाेबत एखाद्या खास रेस्टाॅरंटमध्ये डिनर करा.
 
समजावण्यापेक्षा त्याला समजून घ्या : सर्वप्रथम दरवेळी त्याला जीवनाचे ज्ञान देण्याचा कमीत कमी प्रयत्न करा. यामुळे त्याचा अहम दुखावला जाताे व ताे ते सहन करू शकत नाही. आपण त्याला समजावू शकता पण तेही याेग्य वेळी. जेव्हा ताे आपल्याशी काही शेअर करून सल्ला मागेल तेव्हा त्याला आपल्या इमाेशनल सपाेर्टची अत्यंत गरज असते.