ग्रुप डिस्कशनमध्ये यशस्वी कसे व्हाल?नेतृत्वगुणांची आवश्यकता सादरकर्त्याला त्याच्या बाजूने जायचे नसते आणि विराेधातही जायचे नसते.इथेच नेहमी चूक हाेते. सादरकर्ता अनेकदा जास्त वेळ घेताे. जास्त बाेलणे, चुकीचे बाेलणे हा ग्रुप लीडरचा दाेष आहे.
जाे विषय देण्यात आला आहे, त्याला थाेड्या वेळात सादर करणे आवश्यक आहे.काय आवश्यक आहे?
सादरकर्त्याला आपल्या विषयाचे चांगले ज्ञान असायला हवे.त्याला विषयाला प्रस्तुत करायचे असते, स्वत:ला नाही. ‘माझ्या विचारांनुसार’, ‘मी दाेन गाेष्टी जाेडू इच्छिताे’ यापासून दूर राहायला हवे. विषयाला अशा प्रकारसादर करायला हवे की, ग्रुपमधील सर्व सदस्य त्यात भाग घेण्यास उत्साहित असतील.
सादरकर्त्यांनी सरळ आणि स्पष्टपणे आपल्या विषयाला सादर करायला हवे. ज्या रूपात विषय मिळाला आहे, त्यालाच सादर करायला हवे. ‘मी याच्याशी सहमत नाही’, ‘या विषयात हे कमी आहे’ अशा वा्नयांचा वापर करू नका.
सर्वांच्या विचारांना लक्षपूर्वकऐकणे आवश्यक आहे. विषय संपविताना जे काेणते विविध विचार डिस्कशन मध्ये आलेले असतील, त्या सर्वांचा उल्लेख करा.
ग्रुपला दिलेल्या कालावधीत एका लक्ष्याच्या दिशेने न्यायला पाहिजे.
ग्रुप डिस्कशनमध्ये सर्व सदस्यांचा सहभाग असताे. त्यात त्यांचे व्य्नितमत्त्व, संभाषण काैशल्य, भाषेचे ज्ञान या सर्वांचे मूल्यमापन हाेते.असे असू शकते की, तुम्ही ज्या ग्रुपमध्ये असाल:
तिथे तुम्हालाच विषय सर्वांत आधी सादर करायचा असेल. दुसऱ्या शब्दांमध्ये तुम्हालाच सर्वांत आधी ग्रुप लीडर बनविले गेले किंवा तुम्ही डिस्कशनमध्ये सहभागी असलात तर तुम्ही दाेन्ही प्रकारे काम करण्यासाठी तयार राहायला हवे.
जर तुम्ही सादरकर्ते असाल, तर विषयाला लक्षपूर्वक वाचा. त्यात लपलेला गूढ अर्थ ओळखा. त्यात किती महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यांना समजून घेऊन आपल्या सादरीकरणात ठेवा.
जर तुम्ही सहभागी हाेणारे असाल, तर विषय लक्षपूर्वक वाचा.तुमच्याजवळ लहान स्लिप पॅड असायला हवे. हे ग्रुप डिस्कशनमध्ये दिले जाते. जर नसेल तर लक्षात ठेवायचा प्रयत्न करा.ज्या मुद्द्यावर तुम्हाला बाेलायचे असेल ताे पुन्हा आठवा. त्यावर विचार करा. मग जे दुसरे बाेलत असतील, त्याला लक्षपूर्वक ऐका. बाेलणे आवडले तर चेहरा आनंदी ठेवा. ताेंड बारीक करून बसू नका.