पुणे, 16 जुलै (आ.प्र.) :
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी शनिवारी (13 जुलै 2024) महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला. सोमवारी (15 जुलै 2024) स्वारगेट येथील मुख्य प्रशासकीय कार्यालयात महामंडळाच्या सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन परिवहन महामंडळाच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.