अधीक्षक अभियंतापदी अमित कुलकर्णी,सिंहाजीराव गायकवाड, अनिल घोगरे

    11-Jul-2024
Total Views |
 
adhi
 
पुणे, 10 जुलै (आ.प्र.) :
 
पुणे प्रादेशिक विभागात अमित कुलकर्णी (चाचणी) आणि पुणे परिमंडलात सिंहाजीराव गायकवाड (गणेशखिंड मंडल) व अनिल घोगरे (पायाभूत आराखडा) यांनी अधीक्षक अभियंता म्हणून नुकताच कार्यभार स्वीकारला. प्रादेशिक विभागाच्या चाचणी विभागाचे अधीक्षक अभियंता अमित कुलकर्णी यापूर्वी पुणे ग्रामीण मंडलात कार्यकारी अभियंता (प्रशासन) होते. नुकत्याच झालेल्या अधीक्षक अभियंता पदाच्या थेट भरतीप्रक्रियेत त्यांची निवड झाली. पुणे परिमंडलांतर्गत गणेशखिंड मंडलाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे. याआधी ते भांडुप परिमंडलातील नेरूळ विभागाचे कार्यकारी अभियंता होते; तसेच पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंतापदी अनिल घोगरे यांची बदली झाली. यापूर्वी ते कोकण प्रादेशिक विभागात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते.