सकारात्मक भावना सुखद अनुभव देतात

    08-Jun-2024
Total Views |
 

happy 
 
आम्ही सारे स्वत:ला हे सांगत राहा असताे की, आपण एका व्याकूळ, अत्यंत बिकट काळात जगत आहाेत, पण कधीतरी असा काळ आला आहे का, जाे चिंता, संकट आणि समस्यांपासून मुक्त राहिला आहे. जगात जीवनाचा अर्थच संकटांशी सामना आहे या वास्तवतेकडे आपण पाठ फिरवू शकत नाही.या संकटांचा सामना कसा करावा हे निवडण्याचा पर्याय मात्र आपल्याकडे आहे. नकारात्मक प्रतिक्रिया या नकारात्मक भावनांतून निघत असतात आणि अशा भावनांनी आपल्यात एक इतिहास रचून ठेवला आहे. एवढा की जेव्हा आपण एखाद्या जुन्या चिंतेने वा नैराश्याने घेरलेले असताे तेव्हाही आपल्या प्रतिक्रिया जुन्याच असतात कारण त्या आपल्या भावनांच्या इतिहासातून उपजतात. खरे तर सकारात्मक भावनांचाही आपला इतिहास असताे, पण हा नकारात्मक भावनांएवढा नसताे.
 
सकारात्मक भावना सुखद अनुभवांचे दार उघडतात तर नकारात्मक भावना गतिराेधाला जन्म देतात. भीती मेंदू बधिर करते तर आनंद मनाला जागृत करताे.जे लाेक भीती उपयुक्त असते हे मानण्यासाठी तयार करणारे लाेक एक विकृत मानसशास्त्रीय वैशिष्ट्य आहे. खरे तर असे नसते. असे एक ट्न्नयापेक्षा कमी असते की जेव्हा एखादी लढाई व आक्रमक प्रतिक्रिया आपल्याला सुरक्षेची जाणीव करवून देत असते. इतर वेळी आपण फक्त तणावांना उत्तर देत राहात असताे.याच कारणामुळे बहुतेक लाेक सतत वाईटप्रकारे चिंतेच्या स्थितीत राहतात आणि काेणतीही वाईट घटना घडल्यानंतर त्यांची चिंता भडकून उठते.