शरीर आणि मेंदूचे संतुलन राखण्यासाठी 4 उपयु्नत व्यायाम

    07-Jun-2024
Total Views |
 
 

Health 
 
1. स्लाे स्टँडिग मार्च : दाेन्ही हातांना एखादा आधार घ्या. नंतर हळू हळू एक पाय गुडघा कंबरेच्या वर येईपर्यंत वर उचला. काही सेकंद तसेच थांबा. पुन्हा सामान्यस्थितीत या.आता हेच दुसऱ्या पायानेही करा. काही दिवस असे करीत राहा. नंतर हळूहळू आधार कमी करून एका हाताच्या मदतीने असे करा. काही दिवसांनंतर आधार न घेता असे करा.आता याचा वेग वाढवा व संथ स्टेटिक मार्चप्रमाणे हे करा.
 
फायदा : हा व्यायाम शरीराच्या मुख्य स्नायूंसाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि हृदयराेगाची श्नयता कमी करताे.
 
2. स्क्वॅट्स : यासाठी सरळ उभे राहा आणि पाय खांद्यांच्या रुंदीपर्यंत पसरा. गुडघे वाकवा व हळू हळू बसण्याच्या मुद्रेत या.(बसू नका) जाेपर्यंत आपल्या मांड्या जमिनीला समांतर हाेत नाही ताेपर्यंत बसा. पाच सेकंद थांबा व पुन्हा उभे राहा. राेज अशा 10 स्क्वॅट्सचे तीन सेट करा.प्रत्येक सेटमध्ये दाेन मिनिट अंतर ठेवा. हळूहळू स्क्वॅट्सची संख्या वाढवू शकता. फायदा : हा व्यायाम पायांचे स्नायमजबूत करताे. तसेच शरीराचे संतुलनही उत्तम हाेते.
 
3. स्टँड ऑन वन लेग : दाेन्ही हातांनी बाजुने आधार घ्या. यासाठी आपण एखादी खूर्ची वा खिडकी पकडू शकता.एक पाय वर उचलून 30 सेकंद थांबा. आता सामान्य अवस्थेत या आणि दुसऱ्या पायाने हीच क्रिया करा. काही दिवस असे करीत राहा. नंतर हळूहळू आधार कमी करा. एका हाताने आधार घ्या. एका पायावर उभे राहा. हळूहळू सामान्य अवस्थेत या. हळूहळू आधार पूर्णपणे हटवा. फायदा : यामुळे शरीराच्या खालील भागाची क्षमता वाढते. छाेटे स्नायू मजबूत हाेता. यामुळे शरीराचे संतुलन उत्तम हाेते.
 
4. टंॅडम वाॅक : शरीराचे संतुलन राखणसाठी याहून चांगला व्यायाम असू शकत नाही. टँडम वाॅक असा व्यायाम आहे जाे मागील पायांची बाेटे पुढील पायाच्या टाचेला स्पर्श करतात. एक पाय दुसऱ्या पायाच्या पुढे ठेवत चालत राहा. ज्याप्रमाणे माॅडेल रॅम्प वाॅक करतात. हा व्यायाम जरा माेठ्या जागेत करावा जेणेकरून तिथे किमान 10-15 पावले चालू शकाल. फायदा : यामुळे संपूर्ण धड व स्नायूंचा आपसात ताळमेळ वाढताे. हा आपल्या ए्नसरसाइजचा रूटीन भाग बनवायला हवा.