सांधेदुखीत हे आहेत रामबाण उपाय

    27-Jun-2024
Total Views |
 
 

health 
 
गॅसेसपासून मुक्तता आर्थराइटिस आजाराचा पाेटाशी सरळ संबंध आहे. ज्या लाेकांचं पाेट व्यवस्थित साफ हाेत नाही किंवा अन्न व्यवस्थित पचत नाही, त्यांना आर्थराइटिस हाेण्याचा सगळ्यात जास्त धाेका असताे. म्हणूनच डाॅक्टर म्हणतात, आर्थराइटिसपासून मुक्त हाेण्यासाठी गॅसेसपासून मुक्ती मिळवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी रुग्णाने काही दिवस काेमट अ‍ॅनिमा घ्यावा, यामुळे पाेट साफ हाेण्यास मदत हाेते.स्टीम बाथ आणि मसाज स्टीम बाथ व मसाज आर्थराइटिसमध्ये अत्यंत लाभदायक आहे. खरंतर सरसाेच्या तेलामध्ये लसणाचा रस व कापूस मिसळून मालीश करण्याने खूप आराम मिळताे. लाल तेलाने मालिश करणंही ायदेशीर ठरतं. तर डाॅक्टर म्हणतात, जैतुनच्या तेलाने मालिश करण्याने आर्थराइटिसचा त्रास कमी हाेताे.
 
तांब्याच्या भांड्यात पाणी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं हे सुद्धा आर्थराइटिसच्या आजारात आराम देणारं आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार, अनेक लाेक तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात. यामागील शास्त्रीय कारण असे की, तांब्यामध्ये ऑक्सीकरणराेधी गुण असतात, जे आर्थराइटिसमध्ये हाेणारी जळजळ कमी करण्यास मदत करतात.दिवसभरात पाच लिटर पाणी भरपूर प्रमाणात पाणी पिलं, तर शरीरात युरिक अ‍ॅसिड जास्त प्रमाणात तयार हाेणार नाही. हे मुत्राद्वारे शरीराच्या बाहेर पडेल.त्याचे खडे तयार हाेणार नाहीत.आलं म्हणजे संजीवनी आर्थराइटिसचा त्रास कमी करण्यासाठी आल्याचं सेवन हा रामबाण उपाय आहे.राेज दाेन ग्रॅम आलं दाेनवेळा खाण्याने आर्थराइटिसचा त्रास कमी हाेताे. नुकत्याच झालेल्या वैद्यकीय संशाेधनात आढळलं, सूप आणि सलादबराेबर आल्याचं सेवन करणं हे आर्थराइटिसच्या समस्येत उत्तम.