आदर्श आणि चांगल्या शिक्षकांमधील दहा गुणवैशिष्ट्ये

    22-Jun-2024
Total Views |
 
 
 


ff
 
प्राचीन काळापासून भारतासह जगभरात शिक्षण आणि शिक्षक यांना महत्त्व आहे. नवीन पिढी घडवित असल्यामुळे शिक्षक हे समाजात आदर्श मानले जातात. आपल्या विद्यार्थ्यांना जगात वावरण्यास सक्षम करताे ताे खरा शिक्षक.मात्र, चांगले शिक्षक हे जन्मत नाहीत, तर ते घडविले जातात. कुशल शिक्षक हाेण्याची प्रक्रिया दीर्घ असली, तरी ती जीवन समृद्ध करणारी असते. एक आदर्श आणि चांगला शिक्षक हाेण्यासाठी काय करावे लागते ते पाहा.
 
स्व-प्रतिबिंब : आदर्श शिक्षक कायम त्यांच्या पेशावर प्रेम करतात आणि स्वत:मध्ये सतत सुधारणा करतात. माझ्या विद्यार्थ्यांना मी आज नवीन काय देऊ शकताे, माझ्यात आणखी काय सुधारणा कराव्या लागतील याचा विचार ते करत राहतात.दिवसभरासाठी नियाेजित केलेले काम मी पूर्ण केले का, माझे शिकविणे मुलांना व्यवस्थित कळाले का, असे विचारही हे शिक्षक करतात. हे विचार म्हणजे स्व-प्रतिबिंब असते आणि त्यातून चांगला शिक्षक घडत असताे. कारण, ताे स्वत:मध्ये सतत सुधारणा करून अधिकाधिक अचूकतेचा प्रयत्न करताे.
 
बहु-अनुशासनात्मक : आदर्श शिक्षक शिस्तप्रिय आणि अनेक विषयांत रुची असणारे असतात.त्यांना सतत नवीन काही शिकण्याची इच्छा असते आणि शिकविताना ते नवीन प्रयाेग करतात. शाळेतून बाहेर गेल्यावर आपले विद्यार्थी जगात वावरण्यास पूर्ण सक्षम असावेत म्हणून हे शिक्षक प्रयत्नशील राहतात. एक आदर्श नागरिक घडविण्यासाठी हे शिक्षक प्रयत्न करतात.
 
 
परस्परसंवादी : परस्परांबराेबर संवाद हे आदर्श शिक्षकांचे वैशिष्ट्य असते. ते सहकाऱ्यांबराेबर यश आणि अपयशाचीसुद्धा चर्चा करतात.यांचा विद्यार्थ्यांबराेबर चांगला संवाद असल्याने त्यांचा वर्ग कायम सर्वाेत्तम असताे. मुलांबराेबर माेकळेपणाने बाेलल्याने त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या साेडविणे श्नय हाेते. आपल्या सहकारी शिक्षकांबाबतही त्यांचे असेच धाेरण असते.संशाेधनात्मक वृत्ती : मुलांना अभ्यासक्रम व्यवस्थित समजावा म्हणून आदर्श शिक्षक कायम संशाेधनात्मक वृत्ती जाेपासतात. नवीन प्रयाेगांद्वारे ते एखादा कठीण विषय सुलभ करतात, त्यासाठी नवीन पद्धती वापरतात. आपला प्रयाेग यशस्वी करण्यासाठी असे शिक्षक भरपूर माहिती गाेळा करून तिचा याेग्य वापर करतात. प्रश्न विचारण्यास मुलांना उत्तेजन देऊन ते शंकानिरसनही करतात.विद्यार्थ्यांच्या नव्या कल्पनांचे ते स्वागत करतात.
 
प्रयाेगशीलता : वेगळे प्रयाेग करणे हे काेणत्याही आदर्श शिक्षकाचे वैशिष्ट्य असते. पारंपरिक पद्धती टाळून ते नव्या पद्धती शाेधून मुलांना ज्ञान देतात.काही वेळा असा प्रयत्न असफल झाला, तरी त्यामुळे नाउमेद न हाेता ते त्यात सुधारणा करतात.अपयशाच्या भीतीमुळे अनेक शिक्षक काही नवीन प्रयाेग करणे टाळत असले, तरी आदर्श शिक्षक मात्र ते करतात. फारशा वापरात नसलेल्या पद्धती स्वीकारून ते मुलांना अभ्यासात रस निर्माण करतात.
 
विद्यार्थ्यांना प्राेत्साहन : शिक्षक-विद्यार्थी संवादातूनच विद्यार्थ्यांना प्राेत्साहन मिळत असल्याने चांगले शिक्षक नेहमी असे करतात. पारंपरिक विचारांचे शिक्षक फक्त अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या घाईत असल्याने त्यांचे विद्यार्थ्यांकडे लक्ष जात नाही. पण, चांगल्या शिक्षकांना प्राेत्साहनाच्या परिणामांची माहिती असल्याने ते वेगळा मार्ग स्वीकारतात. मुलांना प्रश्न विचारण्यास ते उत्तेजन देतात आणि त्यातून संवाद वाढताे.तंत्रज्ञानाचा वापर : सध्याच्या काळातील शिक्षक तंत्रज्ञानात कुशल असल्याने शिक्षणात त्याचा वापरही वाढला आहे. काेराेना काळात तंत्रज्ञानामुळेच शाळा सुरू हाेत्या. आता वर्ग पूर्ववत सुरू झाल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर कमी झाला असला, तरी त्याचे महत्त्व कायम आहे. आदर्श शिक्षक तंत्रज्ञानाच्या मदतीने ्निलष्ट विषय साेपा करतात हे महत्त्वाचे.
 
सामाजिक दायित्व : चांगले शिक्षक कायम सामाजिक दायित्वाला महत्त्व देतात. विद्यार्थ्यांना उत्तमातील उत्तम ज्ञान देणे ही आपली जबाबदारी असल्याची जाणीव त्यांना असल्याने ते तसे प्रयत्न करतात. असे शिक्षक मुलांमध्ये प्रिय ठरतात.
 
सतत शिक्षण : चांगला शिक्षक म्हणजे आयुष्यभर विद्यार्थी असणे. प्रशिक्षणाच्या नवीन संधी शाेधून हे शिक्षक त्यांचे ज्ञान सतत अद्ययावत करत राहतात, नवीन काही शिकत राहतात. आपल्या विषयातील अगदी नवीन माहिती मिळविण्यासही ते उत्सुक असतात.
 
सुधारणा : सतत सुधारणा करत राहणे हे चांगल्या शिक्षकांचे वैशिष्ट्य असते. मुलांना शिकविण्यापासून नव्या प्रयाेगांपर्यंत सतत सुधारणेची संधी असल्याचे त्यांना माहीत असल्याने ते स्वत:मध्ये सतत सुधारणा करत राहतात. नव्या पिढीला ज्ञान देण्यापूर्वी आपल्यामध्ये सुधारणा आवश्यक असल्याची जाणीव त्यांना असते.