अस्थमा असल्यास काय करावे अन् काय टाळावे ?

    22-Jun-2024
Total Views |
 
 

asthama 
काय करावे
 
 ज्यांना अस्थमाचा गंभीर अ‍ॅटॅक आला असेल ते डाॅ्नटरांचा सल्ला घेऊन इनहेलरचा वापर सुरू करू शकतात.
 रुग्णाला रिलीव्हर नेहमी साेबत ठेवायला हवा आणि स्पेशरद्वारे इनहेलर वेळेवर घेत राहायला हवे.
 अस्थमाच्या रुग्णाने अ‍ॅलर्जीची टेस्ट करवून घ्यावी. याद्वारे ताे आपल्या अस्थमा ट्रिगर्सचे मूळ कारण जाणू शकताे.
 
काय टाळावे
 
 घरात वा अस्थमाने प्रभावित लाेकांच्या जवळपास धूम्रपान करू नये. धूम्रपान करणेच बंद करावे. कारण अस्थमाने प्रभावित काही लाेकांना कपड्यांवरील धुराच्या वासानेही अ‍ॅटॅक येऊ शकताे. यापासून सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक आहे.
 थंड हवा, खूप जास्त राग वा तणाव अस्थमा वाढण्याच्या मुख्य कारणांपैकी आहे. हे टाळावे.
 कीटक-पतंगे, विशेषत: झुरळे घरात वाढू देऊ नयेत. झुरळे मेल्यानंतरही सुकून धूळमातीचे रूप घेतात व नुकसान करतात.
 पाळीव प्राण्यांना दरआठवड्याला आंघाेळ घालावी. यामुहे आपल्या घरातील मळावर नियंत्रण राहील. त्याला आपल्या बिछान्यात वा बेडरूममध्ये येऊ देऊ नये.
 ज्यांच्या मुलांना अस्थमा आहे अशा पालकांनी संयम बाळगावा जेणेकरून मूल घाबरणार नाही.
 
अ‍ॅलर्जीची मुख्य कारणे
 
 अस्थमाचे सर्वांत मुख्य कारण घर, बिछाना, कार्पेट, पाळीव प्राण्यांत असलेले धुळीचे कण आणि घराबाहेर असलेले धुळीचे कण, तंबाखू, धूम्रपान आणि कार्यस्थळावर असलेले एलजेंट असतात.
 घरात असलेल्या धुळीपासून दूर राहावे. घर व आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. कारण याजागी पसरलेले प्रदूषण दम्याचे कारण बनू शकते.
 एअरटाइट गाद्या, बाॅ्नस स्प्रिंग व उशांचे कव्हर वापरावेत.
 अस्थमाच्या रुग्णाने घरात कार्पेट ठेवूनये. जुन्या फायलीही अस्थमाच्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरू शकतात.
 बेडशीट व मनपसंत स्टफ्ड खेळणी उत्तम क्वालिटीच्या डिटर्जंटने दर आठवड्याला धुवावीत.