युराेपातील सर्जनशील कलामहाेत्सव

    20-Jun-2024
Total Views |
 
 

balance 
 
स्काॅटलंडमधील डनबार येथे हाेणारा द युराेपियन लँड आर्ट फेस्टिव्हल प्रसिद्ध आहे ताे कलांच्या सर्जनशीलतेसाठी.जेम्स क्रेग पेज यांनी 2016मध्ये ताे सुरू केला.गॅजेट्सपासून लांब राहून लाेकांनी निसर्गात रमावे, आपले आराेग्य चांगले राखावे या हेतूने हा महाेत्सव सुरू झाला. सर्व वयाेगटांसाठी ताे खुला असताे. त्यात वाळूचे किल्ले बनविण्यापासून असंख्य कलांना मुक्तद्वार असते. डनबारमधील नदीच्या काठांवर लाेक दगडांपासून कलाकृती तयार करतात. महाेत्सवाच्या काळात डनबार हे गाव पर्यटक आणि स्पर्धकांनी गजबजलेले असते.