मिलेनियल्स आणि जेन-झेडमुळे विवाहांचा खर्च वाढला

    20-Jun-2024
Total Views |
 
 

Marriage 
आयुष्याच्या वाटेवर आपल्याला सर्व प्रसंगांत साथ देणारा जाेडीदार असावा लागताे आणि त्यासाठी विवाह केला जाताे. आयुष्यात एकदाच ताे हाेत असल्याने त्याच्या खर्चात काटकसर केली जात नाही. भारतातील भव्य विवाह समारंभ तर जगभरात ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’ म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. एका विवाह समारंभामुळे अनेकांना राेजगार मिळत असल्याने बाजारपेठही विस्तारत चालली आहे.या मागे आहेत मिलेनियल्स आणि जनरेशन झेड (जेन-झेड) या पिढ्यांतील जाेडपी. विवाहासारख्या महत्त्वाच्या समारंभासाठी सढळ हातांनी खर्च करण्याची त्यांची तयार असल्याने उलाढालही वाढते आहे. पारंपरिकता आणि आधुनिकतेचा संगम साधून विवाहकरण्याचा सध्याचा ट्रेंड आहे. त्यात निमंत्रितांची यादीही वाढते.
 
नवीन जाेडपी आपल्या पसंतीनुसार विवाह करू इच्छित असल्याचे विवाह नियाेजन क्षेत्रातील ‘वेडिंगवायर इंडिया’चे संचालक अनाम झुबेर यांनी सांगितले. विवाह समारंभ आता महाग हाेऊ लागले असून, 2023मध्ये एका विवाहासाठी सर्वसाधारणपणे 28 लाख रुपये खर्च येत हाेता. 2022च्या तुलनेत ही वाढ 12 टक्के हाेती, असे ‘द नाॅट वर्ल्डवाइड’च्या एका अहवालात म्हटले आहे. विवाह नियाेजनाच्या क्षेत्रातील ही कंपनी आहे. वाढत्या खर्चात बाजारपेठेचाही वाटा दिसताे. या वाढत्या खर्चाचा परिणाम जाेडप्यांवरही झाला असून, 53 टक्के दांपत्ये या खर्चाची तरतूद करण्याचे काम करत असल्याचे एका सर्वे क्षणात आढळले आहेकाेराेना महामारीच्या काळात विवाह समारंभांच्या खर्चात कपात झाली हाेती.त्या काळात माेज्नया निमंत्रितांच्या उपस्थितीत विवाह पार पाडले जात हाेते.
 
मात्र, 2023मध्ये हे चित्र बदलले आणि माेठ्या प्रमाणात विवाह समारंभ करू इच्छिणाऱ्या जाेडप्यांचे प्रमाण 59 ट्न्नयांवर पाेहाेचले. या काळात निमंत्रितांची संख्या किमान 300वर पाेहाेचली. 2022च्या तुलनेत ही वाढ 14 टक्के हाेती. अमेरिका आणि ब्रिटनमधील पाहुणेही आता भारतीय विवाह समारंभांना हजेरी लावत असल्याचे आढळले आहे.काेराेना काळानंतर विवाह समारंभाच्या खर्चात वाढ झाली असली, तरी लाेक त्याची फार काळजी करत नसल्याचेही दिसले आहे. एका विवाहामागे अनेक सेवा असतात. चलनवाढीमुळे या सेवांचा खर्चही वाढला असून, त्यात भाेजनसेवेचा (केटरिंग) वाटा 25 ते 27 टक्के आहे.त्यातही काही विशेष मेन्यू हवा असेल, तर हा खर्च आणखी वाढताे. फुलांच्या दरांतही 5-7 टक्के वाढ झाली असून, हंगामानुसार त्यात आणखी वाढ हाेऊ शकते. फर्निचर आणि कामगारांच्या खर्चांतही दुप्पट-तिप्पट वाढ झाली आहे.
 
जगभरातील विवाहांपैकी 25 टक्के भारतात हाेत असल्याचे ‘द नाॅट वर्ल्डवाइड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिमाेथी ची यांनी सांगितले. यात चीनचाही विचार केला, तर जगभरातील निम्मे विवाह याच दाेन देशांत हाेत असल्याचे ते म्हणतात. विवाहाची बाजारपेठ 2023पासून वेगाने वाढत असल्याची माहिती त्यांनी दिली. विवाहाचे नियाेजन करून देणारे डिजिटल प्लॅटफाॅर्म्स वाढल्यामुळे भारतीय दांपत्ये आता विवाहाचे नियाेजन आपल्या इच्छेनुसार करायला लागली आहेत.वाढत्या उलाढालीचा फायदा आतिथ्य आणि वाहतूक क्षेत्रांही मिळताे आहे. विवाहांमुळे माेठ्या हाॅटेल्सना व्यवसाय मिळत असून, त्यांच्या खाेल्या आरक्षित हाेण्याचे प्रमाण वाढले आहे.‘वेडमीगुड’च्या माहितीनुसार, भारतातील विवाह उद्याेग 7-8 चक्रवाढ वार्षिक दराने (सीएजीआर) वाढत असून, 2023- 24च्या हंगामात त्याची उलाढाल 75 अब्ज डाॅलरपर्यंत पाेहाेचेल. भरपूर उत्पन्न आणि खरेदीच्या वाढत्या क्षमतेमुळे विवाह समारंभ अधिक आलिशान हाेऊ लागले आहेत.विवाहासाठी महाग वस्तूंची खरेदी वाढल्याने त्यांचे उत्पादकही बाजारपेठेत दाखल झाले आहेत. मात्र, या बाजारपेठेतील निश्चित उलाढालीचा अंदाज अद्याप आलेला नाही.