मुंबई-गाेवा महामार्ग : 84 कि.मी.चा रस्ता डिसेंबरपर्यंत तयार हाेणार

    20-Jun-2024
Total Views |
 
 
 


highway
 
दीर्घकाळापासून मुंबई-गाेवा हायवेचे काम सुरू असून, याचा महत्त्वाचा टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण हाेत आहे, नॅशनल हायवे अ‍ॅथाॅरिटी (एनएचएआय) च्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की दीर्घ- विलंब झालेला आणि वादग्रस्त मुंबई- गाेवा महामार्ग, विशेषत: पनवेल आणि इंदापूरदरम्यानचा 84 किलाेमीटरचा रस्ता या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्णपणे पूर्ण हाेण्याची अपेक्षा आहे.हा 84 कि.मी.चा भाग दाेन पॅकेजेसमध्ये विभागलेला आहे. पनवेल ते कासू या 42.3 कि.मी. अंतराच्या पॅकेज-1ने 85 ट्न्नयांपेक्षा जास्त भाैतिक प्रगती साधली आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार 40 कि. मी. रस्त्यापैकी सुमारे 39 कि.मी.रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे.या व्यतिरिक्त या पॅकेजमध्ये समांतर सेवा रस्त्याच्या 23.7 कि. मी.पैकी सुमारे 9 कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे.
 
याशिवाय पेण तालुक्यातील गडब येथे काही वाहन अंडरपासचे कामही प्रगतिपथावर आहे.पॅकेज- 2, कासू ते इंदापूर, 42.3 कि.मी. चे अंतर आहे. पूर्वीच्या कंत्राटदाराने 26.67 कि.मी. चाैपदरीकरणाचे काम पूर्ण केले आहे. उर्वरित कामासाठी, कल्याण टाेल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला कंत्राट देण्यात आले हाेते. सध्या या पॅकेजमधील सुमारे 45 टक्के भाैतिक काम पूर्ण झाले आहे.अधिकाऱ्याने सांगितले की, संपूर्ण प्रकल्प डिसेंबर 2024पर्यंत पूर्ण हाेणे अपेक्षित आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत हाेण्यासाठी पूर्ण झालेल्या भागांवर कंत्राटदार रस्ता चांगल्या स्थितीत ठेवत आहे. सुरू असलेली मान्सूनपूर्व कामे प्रगतिपथावर आहेत आणि पावसाळ्यात वाहतूक सुरळीत चालावी यासाठी याेग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मुंबई आणि गाेवा यांना जाेडण्यासाठी 555 कि.मी. लांबीचा मुंबई- गाेवा महामार्ग तयार करण्यात आला आहे.