तळवडे, चऱ्होली आणि दिघीतीलप्रस्तावित विकासकामे मार्गी

आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन

    18-Jun-2024
Total Views |
 
 
ta
पिंपरी, 17 जून (आ.प्र.) :
 
सोसायटी, कॉलनीमधील अंतर्गत रस्ते, सभामंडप आणि मंदिर सुशोभीकरणाच्या कामांसह विविध सहा विकासकामांचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. भोसरी विधानसभा मतदारसंघातील तळवडे, चऱ्होली, मोशी आणि दिघी या भागातील विविध प्रस्तावित विकासकामांचे भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते. दिघीतील दोन रस्त्यांची कामे मार्गी : दिघीमधील गजानन महाराज नगरमधील श्रीराम कॉलनी क्रमांक-1 तसेच भारतमातानगर, गणेश कॉलनी नं. 2 मध्ये प्रस्तावित रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. चऱ्होलीमध्ये नवीन जलवाहिनी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील चऱ्होली येथे लक्ष्मीनारायणनगर येथील नागरिकांच्या मागणीनुसार नवीन जलवाहिनीचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे आगामी काळात पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
 
अहिल्यादेवी होळकर त्यांच्या नावाने होणारा सभामंडप हा अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांची कायम साक्ष देत राहील, असा विश्वास वाटतो. यासह सर्वसमावेशक विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. मतदारसंघातील नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. -महेश लांडगे (आमदार, भोसरी विधानसभा)