चोविसावाडी येथील कचरा संकलनकेंद्राबाबत संभ्रम

    17-Jun-2024
Total Views |
 
 
kach
चऱ्होली, 16 जून (आ.प्र.) :
 
चऱ्होली-चोविसावाडी येथील कचरा संकलन केंद्राला नागरिकांचा विरोध वाढत आहे. अत्यंत गजबजलेल्या आणि प्रचंड प्रमाणात लोकवस्ती झालेल्या भागामध्ये कचरा संकलन केंद्र करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या केंद्राचे कामदेखील नागरिकांनी बंद पाडले असून, 11 महिन्यांपासून कचरा संकलन केंद्राचे काम ठप्प आहे. मात्र दुसरीकडे हे कचरा संकलन केंद्र रद्द झाल्याच्या पोस्ट राजकीय पदाधिकाऱ्यांकडून व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमधील संभ्रम वाढला आहे, तर दुसरीकडे प्रशासन मात्र संकलन केंद्र करण्यावर ठाम आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये कचरा संकलन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेने कासारवाडी येथे कचरा संकलन केंद्र उभारले आहे. प्रत्येक संकलन केंद्रासाठी साधारण चार कोटींहून अधिक खर्च येणार आहे. चोविसावाडी येथे कचरा संकलन केंद्राच्या उभारणीच्या कामाला महापालिकेने या वर्षाच्या जानेवारी महिन्यात सुरुवात केली. मात्र येथील नागरिकांनी या केंद्राला प्रचंड विरोध केला आहे.