राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी घेतली सहकार मंत्रालयाची बैठक

    14-Jun-2024
Total Views |
 
 
minister
 
सहकार राज्यमंत्रिपदाचा पदभार सांभाळल्यानंतर मुरलीधर माेहाेळ यांनी नवी दिल्लीत सहकार मंत्रालयाच्या कार्यालयात बैठक घेतली. याप्रसंगी अधिकाऱ्यांसाेबत मंत्रालयाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आणि व्हिजनवर चर्चा केली. चर्चेत माेहाेळांचे सहकारी राज्यमंत्री कृष्णपाल व वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. देशभरात सहकारी क्षेत्राचा विस्तार हाेत आहे, यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. हे लक्षात घेत सहकार क्षेत्र आणि सहकार मंत्रालयाला नेहमी सावध राहणे आवश्यक आहे, असे माेहाेळ यांनी सांगितले. या काळात अधिकाऱ्यांनी कामकाजात पूर्ण समर्थन देण्याचे व देशाच्या प्रगतीत याेगदान देण्याचे आश्वासन दिले.