जगातील सर्वांत लहान श्वान

    14-Jun-2024
Total Views |
 
 

dogs 
 
‘चिचुआहुआ’ प्रजातीची ‘पर्ल’ ही आकाराने जगातील सर्वांत लहान श्वान ठरली आहे. पंजांपासून खांद्यांपर्यंत तिची उंची फक्त 9.14 सेंटिमीटर (3.59 इंच) असून, फ्लाेरिडातील ओरलँडाे येथे एका पशुवैद्यकाने 23 ऑगस्ट 2022 राेजी ही उंची माेजली. व्हेनेसा सेमियर यांची याच प्रजातीची ‘मिरॅकल मिली’ ही श्वान 2013मध्ये सर्वांत लहान हाेती.तिची उंची 9.65 सेंटिमीटर (3.79 इंच) हाेती. मात्र, ‘पर्ल’ची उंची तिच्यापेक्षाही कमी असल्याने आता ती जगातील सर्वांत लहान आकाराची श्वान ठरली आहे. ‘पर्ल’ ही श्वानही व्हेनेसा यांनीच पाळली आहे हा याेगायाेग म्हणावा लागेल.