आता अमेरिकेतही वाजताेय भारतीय पाणीपुरीचा डंका

    14-Jun-2024
Total Views |
 
 

US 
 
सर्व भारतीयांची आवडती पाणीपुरी आता अमेरिकनांनाही आवडायला लागली आहे. मिनियापाेलीस शहरातील ‘करी काॅर्नर’ या रेस्टाॅरंटने बाहेर स्टाॅल लावून स्थानिकांना पाणीपुरी देणे सुरू केले आहे. तिखट चटणी, मसाल्यांचे पाणी आणि बटाटा-चण्याचे सारण भरलेल्या खुसखुशीत पुऱ्या म्हणजे पाणीपुरी. हा चटकदार पदार्थ सर्व भारतीयांच्या पसंतीला उतरला आहे.गेल्या काही वर्षांत पाणीपुरी जगभरात लाेकप्रिय हाेऊ लागली असून, आता अमेरिकेतील मिनियापाेलीसचे नागरिकही तिचा आस्वाद घेऊ लागले आहेत. ‘करी काॅर्नर’ या रेस्टाॅरंटने लाेकांना पाणीपुरी देणे सुरू केले असून, त्या संदर्भातील दाेन व्हिडिओ नुकतेच व्हायरल झाले आहेत.लाेकांनी स्टाॅलवर येऊन पाणीपुरी खाऊन पाहावी, असे आवाहन स्टाॅलधारक करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते.
 
अमेरिकन लाेकांसाठी हा पदार्थ नवीनअसल्याने काहींनी उत्सुकतेमुळे पाणीपुरी खाऊन पाहिली आणि ‘अप्रतिम’ असे मत व्यक्त केले. एका पुरीमध्ये एवढे पदार्थ भरून एका घासात पुरी गट्ट कशी केली जाते, या बाबत एकाने आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्हिडिओंना आतापर्यंत चार दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.‘दे वेअर लेफ्ट स्पिचलेस. कम बाय करी काॅर्नर इन मिनियापाेलीस फाॅर डाइन इन ऑर टेक आउट’ असे दुसऱ्या व्हिडिओचे शीर्षक असून, अनेक लाेक पाणीपुरी खात असल्याचे त्यात दिसते.‘मी शिकागाेमध्ये असताना भारतीय पदार्थांच्या स्टाॅलवर प्रथम पाणीपुरी खाल्ली हाेती. ती मला फारच आवडली,’ असे एका खवय्याने म्हटले आहे, तर ‘प्रेमात पडावा असाच हा पदार्थ आहे,’ असे दुसरा म्हणताे. ‘भारतीय पदार्थ खराेखरच फार चविष्ट असतात,’ असे तिसरा सांगताे आणि ‘जगात पाणीपुरी लाेकप्रिय का हाेते आहे हे मला आता समजले,’ अशी प्रतिक्रिया अन्य एकाने व्यक्त केली आहे.