अ‍ॅसिडिटी व पचनाच्या तक्रारी दूर करण्यासाठी याेगा करा

    14-Jun-2024
Total Views |
 
 

Acidity 
 
अ‍ॅसिडिटी हाेण्याचे एक संभाव्य कारण जेवल्यानंतर त्वरित आराम करणे वा झाेपी जाणेही असू शकते. जास्त मसालेदार, ऑयली खाल्ल्यामुळेही अ‍ॅसिडिटी हाेऊ शकते. जीवनात जास्त तणावअसून या सवयीही अ‍ॅसडिटी वाढण्याचे कारण बनते.अ‍ॅसिडिटी व पाेटातील गॅससाबत पाेटात अस्वस्थता, असहजता व जळजळही हाेऊ शकते. या समस्येत आपण ना याेग्यप्रकारे खाऊ शकता ना खाल्लले पचवू शकता. पण चांगली गाेष्ट ही की, याेग ही समस्या साेडवण्यास मदत करू शकते. इथे अशीच काही याेगासने देत आहाेत जी गॅस व अ‍ॅसिडिटीच्या समस्येत आराम देतील.
 
 पवन मुक्तासन : पवन मुक्तासनाचा नियमित सराव बाेवेल मूव्हमेंट्स प्राेत्साहित करण्यास मदत करते. हे आसन पाेटाचे स्नायू व संपूर्ण अब्डाॅमेन एरिया स्ट्रेच करण्यास मदत करते.जेवण व्यवस्थित पचवण्यास मदत करण्याव्यतिरिक्त हे डायजेस्टिव्ह सिस्टीममधून टाॅ्निसन्स बाहेर काढण्यास मदत करते.
 
 अर्धमत्स्येन्द्रासन : अर्धमत्सेन्द्रासन शरीराला टिव्स्ट करणे डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी सर्वांत उत्तम डिटाॅ्नस आहे. हे टाॅ्निसन्स बाहेर काढण्यास मदत करते आणि रक्ताभिसरण वाढवते. तसेच हे आपल्या पचनतंत्रात ऑ्निसजनचा प्रवाह वाढवते आणि अ‍ॅसिडिटी कमी करते.
 
 बालासन : बालासन ऐ रेस्टिंग पाेज आहे. हे पचनप्रणालीला आराम देते व अ‍ॅसिडिटीपासून आराम देण्यात मदत करते.जेव्हा आपण या आसनात असता तेव्हा आपल्या पाेटाचे अवयव स्ट्रेच करण्यात मदत मिळते आणि ते मजबूत हाेतात.बालासन तणाव व थकवा कमी करून मांड्या, जांघा व घाेट्यांना स्टे्रच करते. 
 
 पश्चिमाेत्तानासन : पश्चिमाेत्तानासन वा फाॅरवर्ड बेंड पाेज पाेटाच्या अवयवांना सुदृढ ठेवण्यासाठी एक लाभदायक याेगासन आहे. ही मुद्रा फक्त अवयव व्यवस्थित काम करण्यात आणि पचनसमस्यांचा उपचार करण्यातच मदत करीत नाही तर मासिक पाळीही नियमित करण्यास उपयुक्त असते. याचा नियमित सराव केल्यास आपल्याला टमी फॅट कमी करण्यासही मदत मिळू शकते. हे आसन मांड्या, कंबर, दंड, खांदे व अ‍ॅब्डाेमेन एरिया स्ट्रेच करून रक्ताभिसरण वाढवते.
 
 वज्रासन : वज्रासन गॅसची समस्या दूर करण्यासाठी प्रमुख याेगासन आहे. हे आसन पाेट व आतड्यात रक्तप्रवाह वाढवते आणि अन्न प्रभावीपणे पचवण्यास मदत करते. ज्यामुळे अ‍ॅसिडिटी, गॅस आणि अपचन अशा समस्या हाेत नाही. या आसनाचा सराव आपण राेज करायला हवा.