जाॅबसाठी रेझ्युमे कसा लिहावा...

    13-Jun-2024
Total Views |
 
 

job 
 
रेझ्युमे की सीव्ही? आपल्या अर्जाला रेझ्युमे म्हणावं की करिक्युलम व्हिटे (सीव्ही) ही गाेष्ट बहुतेकांना माहीतच नसते. रेझ्युमे म्हणजे फक्त आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि अप्लाय केलेल्या क्षेत्रातला अनुभव यांचा थाेडक्यात गाेषवारा.तर सीव्ही म्हणजे आपली शैक्षणिक पात्रता, आपण केलेली काही खास प्राेजेक्ट्स, आतापर्यंतच्या कामाचा अनुभव आणि मिळालेल्या विविध पुरस्कारांची विस्तृत माहिती हे ध्यानात ठेवलं पाहिजे.
 
रिव्हर्स क्राेनाेलाॅजिकल रेझ्युमे : यात नावाप्रमाणेच आपला अनुभव, आपलं अलीकडचं शिक्षण उतरत्या क्रमाने लिहलं जातं. तुम्ही जर नुकतेच ग्रॅज्युएट झाला असाल तर प्रामुख्याने रिव्हर्स क्राेनाेलाॅजिकल पद्धतीचा रेझ्युमे लिहावा.
 
फंक्शन रेझ्युमे : तुमच्याकडे असलेले वेगवेगळे स्किल्स यात लिहिले जातात.आयटी प्राेफेशनल्स तसेच मार्केटिंग क्षेत्रातील लाेक या पद्धतीचा रेझ्युमे लिहतात.
 
काॅम्बिनेशन रेझ्युमे : या प्रकारामध्ये रिव्हर्स क्राेनाेलाॅजिकल आणि फंक्शनल रेझ्युमे यांचं मिश्रण असतं.रेझ्युमे लिहिताना... आपलं नाव, पत्ता, ई मेल आयडी, माेबाइल नंबर आणि घरचा लॅण्डलाइन फाेन नंबर या माहितीनेच आपल्या अर्जाची सुरुवात करावी. त्याच्यापुढे तुमची शैक्षणिक पात्रताइतर शिक्षण, काॅम्प्युटरचं ज्ञान, कामाचा अनुभव, एक्ट्राकरिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज, प्राेफेशनल असाेसिएशन असावी. त्यानंतर वैयक्तिक माहिती उदाहरणार्थ जन्मतारीख, मॅरिटल स्टेटस, छंद आणि बाेलता-लिहिता आणि वाचता येणाऱ्या भाषा लिहाव्यात.त्यानंतर या आधी काम करण्याचा अनुभव असल्यास त्याविषयी थाेडक्यात लिहावं.तसंच ज्या माहितीतून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू दिसतील अशी माहितीही रेझ्युमेमध्ये जरूर लिहावी.
 
काय लक्षात घ्यावे? रेझ्युमेमध्ये नाव लिहिताना आपलं पूर्ण नाव लिहा. पत्ता नेमका आणि अचूक लिहावा. शैक्षणिक पात्रता लिहिताना क्लास किंवा टक्के यापैकी एकच काहीतरी लिहा.एखादा समर जाॅब केला असेल तर त्याची माहिती आणि कामाचं स्वरूप जरुर लिहा.इंटरनॅशनल जाॅबसाठी अप्लाय करताना आपल्या पत्त्यातला पिनकाेड, माेबाइलचा कण्ट्री काेड आणि आपलं नागरिकत्व लिहायला विसरू नका. कामाचं स्वरूप पाहून गरज असेल तरच आपला फाेटाे पाठवा. फाेटाेही फाॅर्मल्स किंवा ज्याप्रकारे मागणी केली असेल त्या प्रकारेच पाठवावा.रेझ्युमेमधील माहिती, स्पेलिंग, व्याकरण, विरामचिन्हं पुन्हा पुन्हा तपासून पाहा. कुठेही अप्लाय करताना आपला रेझ्युमे शक्यताे जाणकार व्यक्तीकडून एकदा वाचून घ्या.