ऑटिझमची अवस्था म्हणजे मानसिक अपंगत्व नव्हे

    12-Jun-2024
Total Views |
 
 

health 
 
ऑटिझमची लक्षणे ही मुलांच्या मेंदूत काही असामान्य परिस्थितीमुळे उत्पन्न हाेणारी अवस्था असून ज्यात इतरांशी भावनिक जिव्हाळा नसताे.या आजाराने ग्रस्त लाेकांचे स्वत:चेच जग असते. तसेच समजण्या-बाेलण्याचीही समस्या असते. यांची शिकण्याची क्षमताही कमी असते. ऑटिझमची सुरुवातीची लक्षणे दीड ते तीन वर्षच्या वयात दिसण्यास सुरुवात हाेते. पण सामान्यत: मूल छाेटे आहे असे मानून आई-वडील हे समजू शकत नाहीत.आजार तेव्हा कळताे जेव्हा मूल शाळेत जाऊ लागते. याच्या मुख्य लक्षणांत इतर मुलांसाेबत न खेळणे, नजरेला नजर न देणे, हाक मारल्यानंतर आवाजाच्या दिशेने न पाहणे, काेणत्याही गाेष्टीत रस न घेणे इ.
सामील आहेत.
 
थाेउे माेठे झाल्यानंतरअर्थपूर्ण वा्नय बाेलू न शकणे, हायपरअ‍ॅ्निटव्ह हाेणे, इतर मुलांसाेबत मारामारी करणे, शब्दरीपिट करणे, एकच क्रिया वारंवार करणे इ. लक्षणेही दिसू लागतात. यातील बहुतेक मेंटल रिटार्डेशन नसतात पण शिकतना फाेकस करू न शकल्यामुळे यांना शाळेत काही समस्या येतात.कसा कळताे आजार? ऑटिझमची श्नयता 200पैकी एका मुलाला असते. ज्याचे गांभीर्य सर्वांमध्ये वेगवेगळे असू शकते. ऑटिझम कळण्यासाठी काेणत्याही सीटीस्कॅन वा एमआरआय इ.ची गरज नसते. डाॅ्नटर्स फक्त ्नलीनिकल परीक्षण व आई-वडिलांना विचारलेल्या काही प्रश्नांच्या आधारे याची तपासणी करतात. सुमारे दहा टक्के ऑटिझमचे रुग्ण एखाद्या विशिष्ट प्रतिभेत खूप चांगले असतात. उदा. गणित, संगी,चित्रकला व अशाच कला.
 
कारण आणि बंदाेबस्त ऑटिझमचे काेणतेही बाह्य कारण माहीत नाही. जीन्समध्ये काही असामान्य मेंदूच्या वाढीत असामान्यत्व आणू शकतात.चांगली गाेष्ट ही की, काळासाेबत आजार वाढत नाही कारण मूळ माहीत नसल्यामुळे बंदाेबस्ताची काेणतीही पद्धत वैद्यक शास्त्रात विकसित हाेऊ शकलेली नाही. ऑटिजम काेणाला हाेणार आहे व काेणाला नाही हे ना आधी समजू शकते व ते राेखता येते.दीड ते दाेन वर्षांतच ऑटिझम आहे वा नाही हे समजण्यासाठी आई-वडिलांना विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे केला जाणारा चॅट स्काेर ऑटिझम समजण्याची एक उपयुक्त व साेपी पद्धत आहे.ऑटिझमवर काेणताही उपचार नाही, पण लवकर उपाय सुरू केल्यास मुलाचे वागणे, शिकणे, बाेलण्याची क्षमता सुधारता येऊ शकते.