नवी संकल्पना तुम्हाला आनंद देईल

    12-Jun-2024
Total Views |
 
 

Happy 
 
चित्रपट,पार्टी, कुटुंब, जेवण आदी बाबींसाेबतच स्वत:साठी वेळ काढणे विसरून जाता. त्यामुळे वीकेंडला अशी वेळ निश्चित करा की, दाेन तास तुम्ही स्वत:ला द्याल. या दाेन तासांमध्ये तुम्ही निवांत झाेपही घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला नवी ऊर्जा मिळेल.वीकेंड म्हटले की, शक्यताे तुम्ही घरातील स्वच्छता आणि साफसफाईचे नियाेजन करता. शनिवार किंवा रविवारपैकी एकच दिवस आणि वेळ सफाईसाठी निश्चित करा. आठवड्यातील इतर दिवशीही सफाई करत राहा. अनेकदा वीकेंडला मित्र आणि नातेवाइकांशी भेटण्याचे नियाेजन केले जाते. पण यामुळे तुम्ही पूर्ण दिवस व्यस्त राहता.
 
शनिवारी एखाद्यासाेबत नाष्टा करण्याचे ठरवले असेल तर पुन्हा इतर काेणासाेबत दुपार किंवा रात्रीच्या जेवणाचे नियाेजन करू नका.
सुटी असल्याचा विचार करून तुम्ही स्वत:ला लंच, ब्रेकफास्ट आणि डिनरसाठी दुसऱ्यांसाेबत गुंतवता.परिणामी हेक्टिक शेड्यूल बनते काेणत्याही एकाचा याेग्य प्रकारे आनंद घेऊ शकत नाही. त्यामुळे शनिवार आणि रविवारी घराबाहेर केवळ एक आणि एकाच कार्यक्रमाचे नियाेजन करायला हवे.पूर्वी कधीही गेलेल्या ठिकाणाला रविवारी भेट द्या आणि असे काही करा की, जे पूर्वी कधीच केले नव्हते. तुम्हाला आवडेल तिथे जाण्याचे ठरवा. एखादे नाटक, संगीतकार्यक्रम, कला प्रदर्शन किंवा इतर काहीही असू शकते. ही नवी संकल्पना तुम्हाला आनंद आणि संताेषदेखील देईल.