सन 2095 पर्यंत कुटुंबात चुलत भावंडे नसणार

    12-Jun-2024
Total Views |
 
 
 

Family 
पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती, नातेवाईक, गाेतावळा या संकल्पना गेल्या दशकामध्ये कमी हाेत गेल्या. कुटुंबे लहान लहान हाेत गेली. जर्मनीतील मॅ्नस प्लॅन्क इन्स्टिट्यूट फाॅर डेमाेग्राफिक रिसर्चने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले, की आता जगभरात कुटुंबाच्या नातेवाइकांच्या संख्येमध्ये 35 ट्न्नयांनी घट झाली आहे. या अभ्यासकांनी युनायटेड नेशन्स 2022च्या रिव्हिजन ऑफ द वर्ल्ड पाॅप्युलेशन प्राॅस्पे्नट्स या अभ्यासातून ही आकडेवारी प्राप्त केलेली आहे.जर्मनीतील डायवेल्ट या संस्थेच्या सांगण्यानुसार हा अहवाल वापरून गणितीय माॅडेल्स तयार करण्यात आली आणि त्यातून कुटुंबांच्या नात्यांचा शाेध घेण्यात आला.त्यानुसार प्रत्येक देशातील 1 हजर नात्यांचा नकाशा तयार करून त्याचा वापर माॅडेल म्हणून करण्यात आला.
 
त्यानुसार 65 वर्षांच्या महिलेला सरासरी 41 जिवंत नातेवाईक 1950मध्ये असायचे. सन 2095मध्ये याच वयाच्या महिलेला केवळ 25 जिवंत नातेवाईक असतील अशी परिस्थिती उद्भवणार आहे. अभ्यासात असे दिसून आले, की कुटुंबे आक्रसत आहेत. त्याचबराेबर 2095पर्यंत कुटुंबांची रचनादेखील पूर्णपणे वेगळी असेल. सध्या कुटुंबाचा वृक्ष काढला, तर त्यामध्ये आजी-आजाेबा, त्यानंतर त्यांच्या शाखा, त्यांची मुले, अनेक चुलत भावंडे, नातवंडे, पतवंडे, असा सगळा गाेतावळा असताे. त्यातून असे दिसते, की सध्या कुटुंबांमध्ये ज्येष्ठ नागरिकांपेक्षा मुलांची आणि तरुणांची संख्या लक्षणीय आहे. त्यामध्ये भविष्यात फेरसंतुलन हाेण्याची चिन्हे आहेत.आंतरराष्ट्रीय संशाेधनाचा निष्कर्ष असा आहे, की भविष्यातील कुटुंबांमध्ये पणजाेबा आणि आणि त्यामुळे कुटुंबाचा आकार वृक्ष आणि त्याच्या फांद्या अशा स्वरूपापेक्षा ताे नारळाच्या वृक्षाप्रमाणे सरळसाेट एकाच खाेडावर असेल.