भाेवतीचे वातावरण आनंदी ठेवण्यासाठी गाेड बाेलावे

    11-Jun-2024
Total Views |
 
 

Happy 
 
डाेळे बाहेरच पाहात असतात. पण ते आतही पाहू शकतात हे हळूहळू आपण विसरून जाताे. जेव्हा आपण डाेळे मिटताे तेव्हाही आतील दृश्ये बाहेरचीच असतात. संत कबीर म्हणतात, ‘उल्टी ज्याेति कर लाे।’ याचा अर्थच हा आहे की, थाेडे आत डाेकवा. जेव्हा आपण डाेळ्यांबाबत असा प्रयाेग करू लागताे तेव्हा शांत हाेऊ लागताे.शब्दांसाेबतही असे करता येऊ शकते. आपल्याला बाेलायचेही आहे आणि ऐकायचेही आहे. या दाेन्ही क्रिया एकत्र चालू असतात.त्यामुळे याबाबत एक प्रयाेग करा, घाेळून आणि गाळून. याचा अर्थ जेव्हा आपण शब्द बाहेर फेकत असताे तेव्हा त्यात गाेडवा घाेळवून ते बाेलावेत, आणि जेव्हा शब्द ऐकत असताे तेव्हा त्यातील अप्रिय शब्द गाळून इतर शब्द आत घ्यावेत.
 
इतरांनी बाेललेल्या शब्दांना ऐकायचे असेल त्यांच्यावर आपले नियंत्रण नसू शकते. यासाठी काय ऐकावे यावर नियंत्रण ठेवावे. येथे गाळण्याची प्रक्रिया उपयाेगी पडेल.बाेलण्यावर आपला ताबा असू शकताे. त्यामुळे त्यात घाेळण्याची क्रिया करावी अर्थातच गाेडवा घाेळावा. जेवढे गाेड बाेलाल तेवढा त्याचा सर्वांत माेठा परिणाम हा हाेईल की, त्यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण पाॅझिटिव्ह हाेईल, कारण शब्दही आपल्या लहरी घेऊन येत असतात आणि वातावरण प्रभावित करीत असतात. इतरांना ऐकवण्यासाठीच गाेड बाेलू नये तर स्वत:च्या भाेवतालचे वातावरण आनंदी करण्यासाठीही गाेडवा घाेळवून बाेला आणि गाळून ऐका.