फावल्या वेळेसाठी हाॅबी असायला हवीच का?

    10-Jun-2024
Total Views |
 
 
hobby
 
1. स्वत:वर दडपण टाकू नका : बहुतेकजण एखादी नवी भाषा शिकतात, चित्रे काढतात, पाॅटरी करतात, नवे वाद्य वाजवायला शिकतात वा त्यांना जे आवडते ते करणे सुरू करतात. ते साेशल मीडियावर आपले फाेटाेही टाकतात. अशा वेळी ज्यांना काेणताही छंद नसताे ते स्वत:त उणीवा शाेधू लागतात. जर आपल्याला काेणतीही हाॅबी नसेल तर काय करावे? स्वत:ला कसे खूश ठेवावे? मानसशास्त्रज्ञांच्या मते ज्यांना काेणतीही आवड नसते ते स्वत:वर उत्तम हाेण्याचे दडपण टाकू लागतात. असे करू नये.स्वत:ला समजण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगळे असते. काेणाचे पाहून त्याच्यासारखे करण्याचा प्रयत्न करू नये. आपले व्यक्तिमत्व समजून आपल्याला काेणती गाेष्ट आनंद देते ते पाहावे.
 
2. आत्मविश्वास गमावू नये : आपल्याभाेवती तू बाहेर फिरायला जात नाही का, तुला काेणी मित्र नाही का तुला काही नवे करावेसे का वाटत नाही, काही नवे सुरू केले तर जास्त काळ मन का रमू शकत नाही. असे प्रश्न उभे राहतात. या प्रश्नांना घाबरू नये. आपले व्यक्तिमत्व इतरांच्या स्तुतीसाठी नाही. इतरांऐवजी स्वत:ला हे विचाराल तर खरे व चांगले उत्तर मिळेल.
 
3. आपल्या गतीने चाला : जर एखाद्याचे पाहून आपल्यालाही तसेच करावेसे वाटत असेल तर हळू हळू तसे करण्यास सुरुवात करा आणि आरामात कसे वाटते ते पहा. जे कराल ते आपल्या वेगाने करा. ते आपण आपल्या आनंदासाठी करीत आहाेत, काेणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी नाही हे लक्षात ठेवा.
 
4. आळस वा सबब नकाे : काेणत्याही नव्या छंदापासून दूर हाेण्याचे कारण आपला आळस वा बेपर्वाई तर नाही ना ते पहा. आपण काही नवे करू इच्छित असताे पण स्वत:च सबबी सांगून मागे हटत असताे. स्वत:शी प्रामाणिक व पारदर्शी वागा. जर आळस काही करण्यापासून राेखत असेल तर स्वत:ची पाठ थाेपटून पुढे जा.
 
5. आवड हाेईल आपला आरसा : काेणतीही व्यक्ती फावल्या वेळी काय करते वा त्याच्या हाॅबीज काय आहेत हे त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही सांगते. काेणताही छंद जाेपासा, काेणत्याही आवडीला वेळ द्या पण स्वत:शी प्रामाणिक राहा. जे कराल ते स्वत:च्या आनंदासाठी करा. यासाठी अशी आवड जाेपासा जाे आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा हाेईल.
 
6. धीरापाेटी फळे गाेमटी : काेणताही नवा छंद जाेपासणे साेपे नसते. ते आव्हानात्मक असते.आपण वारंवार चुकता, वैतागता, बिचकता. घाबरता व तेव्हा कुठे नवे शिकू शकता. काेणताही नवा छंद जाेपासण्यासाठी खूप धीर धरावा लागताे. अशावेळी कठिण लक्ष्य समाेर ठेवू नये. शिकण्याची घाई करू नये. खाेट्या आशा बाळगू नयेत. सावकाश शिका व आनंद घ्या.
 
7. रिकामे राहण्याचा आनंद : जिथे आनंद जाणताे तिथेच पुढे जा. नकाेसे वाटत असेल तर थांबा.पुढील वेळी काेणी आपल्याला रिकाम्या वेळी काय करता असे विचारले तर बेलाशक सांगा की आपण फावल्या वेळी रिकामे बसून राहता.