शरीरातील पाण्याचे प्रमाण याेग्य राहण्यासाठी बनवा दिनचर्या

    10-Jun-2024
Total Views |
 
 

health 
सामान्यत: आपण राेज कमीत कमी 8 ग्लास (1 ग्लास =250-300 मिली) पाणी प्यायला हवे. जर हे याेग्य वेळी प्याले गेले तर हे आराेग्यासाठी अत्यंत लाभदायक हाेईल. विशेषज्ञांकडून पाणी केव्हा केव्हा प्यावे हे जाणून घ्या.
 
पहिला ग्लास : सकाळी उठून शिळ्या ताेंडानेच पाणी प्यायला हवे. यामुळे मेटाबाॅलिज्म वाढताे, जादा कॅलरीज कमी हाेतात. हे पाणी नैसर्गिक गाळणीच्या रूपात विषारी पदार्थ बाहेर काढते व पचन उत्तम हाेते.ऊर्जेचा स्तर व चेतनाही वाढते.
 
दुसरा ग्लास : नाश्ता केल्यानंतर एक तासानंतर पाण्याचा दुसरा ग्लास प्या. यामुळे खाण्याचे पचन चांगल्याप्रकारे हाेत असते आणि शरीराची राेगप्रतिकारक्षमता वाढते. याशिवाय सांधे व कार्टिलेजचे ग्रीसही वाढते.
 
तिसरा ग्लास : दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्याल्यामुळे पचनास मदत हाेते. यावेळी प्यालेले पाणी फ्नत जादा फॅटच कमी करीत नाही तर मेटाबाॅलिज्म वाढवण्यासही मदत करते.
 
चाैथा ग्लास : जेवणानंतर लगेच प्यालेले पाणी वषासमान असते. तेच जेवण केल्यानंतर एक तासानंतर पिल्यास ते अमृतासारखे काम करते. या काळात शरीराला अन्नातील पाैष्टिक घटक शाेषण्यास पुरेसा वेळ मिळताे.ज्यामुळे रक्त व स्नायूनिर्मितीस प्राेत्साहन मिळते.
 
पाचवा ग्लास : चहा वा काॅफी ब्रेकपूर्वी (दुपारच्या जेवणानंतर सुमारे 2 तासांनंतर) पाणी प्याल्यास शरीरात अ‍ॅसिडचे प्रमाण कमी करता येऊ शकते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासही मदत मिळते.
 
सहावा ग्लास : संध्याकाळच्या जेवणाच्या एक तास आधी पाणी प्यायला हवे. यामुळे तुम्ही जादा जेवण(ओव्हरइटिंग) टाळू शकता. तसेच यावेळी पाणी प्याल्यामुळे काेलन कॅन्सरचा धाेकाही कमी हाेताे.
 
सातवा ग्लास : रात्रीच्या जेवणानंतर एक तासानंतर पाण्याचा सातवा ग्लास प्याल्यामुळे शरीराला जेवणातील पाैष्टिक घटक चांगल्या प्रकारे शाेषून घेण्यास मदत मिळते आणि बद्धकाेष्ठतेपासून सुटका मिळते.
 
आठवा ग्लास : रात्री झाेपण्याच्या अर्धा तास आधी पाणी प्यायला हवे. यामुळे झाेपेतील शरीरातील पाण्याची पूर्तता हाेत असते आणि स्ट्राेक वा हार्ट अ‍ॅटॅकचा धाेकाही कमी हाेताे.