सनातन संस्थेचे संस्थापक डाॅ. आठवले यांना यंदाचा भारत गाैरव पुरस्कार

    10-Jun-2024
Total Views |
 

awards 
 
भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांच्या जागतिक प्रसारासाठी केलेल्या अद्वितीय याेगदानासाठी सनातन संस्थेचे संस्थापक डाॅ. जयंत आठवले यांना यंदाचा मानाचा ‘भारत गाैरव पुरस्कार’ घाेषित झाला. संस्कृती युवा संस्थेच्या वतीने 5 जूनला फ्रान्सच्या संसदेत पार पडलेल्या दिमाखदार साेहळ्यात डाॅ. आठवले यांच्या वतीने त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी साै. बिंदा सिंगबाळ आणि साै. अंजली गाडगीळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.फ्रेंच संसदेचे उपाध्यक्ष डाॅमिनिक थिओफिल, मेहेंदीपूर बालाजी ट्रस्टचे नरेशपुरी महाराज, संस्कृती युवा संस्थेचे अध्यक्ष पं. सुरेश मिश्रा आणि फ्रेंच संसदेचे सदस्य फ्रेडरिक बुवेल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. जागतिक स्तरावरील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित हाेते.
 
भारत गाैरव पुरस्कार साेहळा यापूर्वी युनायटेड किंगडम हाऊस ऑफ काॅमन्स (ब्रिटन), संयु्नत राष्ट्रे, अटलांटिस आणि दुबई अशा प्रतिष्ठित ठिकाणी आयाेजित करण्यात आला हाेता. डाॅ. आठवले जागतिक कार्तीचे संमाेहन तज्ज्ञ आहेत.त्यांनी जिज्ञासू वृत्तीने अध्यात्मशास्त्राचा सखाेल अभ्यास केला आहे. त्यांनी व्याख्याने, सत्संग, अभ्यासवर्ग यांतून अध्यात्म वैज्ञानिक पण साेप्या भाषेत सांगायला सुरुवात केली. सनातन संस्थेचे अनेक साधक गावाेगावी जाऊन अध्यात्माचा प्रसार करीत आहेत.भारतासारख्या संस्कृतीप्रिय देशात आज भ्रष्टाचार हाच शिष्टाचार हाेऊ लागला आहे. हातातील स्मार्टफाेनचा दुरुपयाेगही हाेत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत समाजात नैतिक मूल्ये रुजविण्याचे आणि त्यांचे संवर्धन करण्याचे कार्य डाॅ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातन संस्थेचे साधक करीत आहेत.
 
हिंदू धर्माविषयी अर्थपूर्ण माहिती सनातन संस्थेच्या सत्संगातून आणि धर्मशिक्षण वर्गातून सांगितली जाते.याबाबतचे ज्ञानभांडार संस्थेचे संकेतस्थळ आणि यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून खुले केले आहे. डाॅ. आठवले यांनी संकलित केलेले अध्यात्मातील विविध अंगांची माहिती देणारे असंख्य ग्रंथ सनातन संस्थेने आजपर्यंत विविध भाषांमध्ये प्रकाशित केले आहेत. त्यांचा झालेला हा सन्मान म्हणजे त्यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या दिव्य अध्यात्मकार्याचा सन्मान असल्याचे मत डाॅ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी साै. बिंदा सिंगबाळ यांनी हा पुरस्कार स्वीकारताना व्य्नत केले.