राजस्थानात शेतकऱ्यांना बडिशेप पिकाचा पर्याय

    10-Jun-2024
Total Views |
 
 


Rj
 
 
राजस्थानातील चार वाळवंटी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लवकरच बडिशेपच्या शेतीचा पर्याय उपलब्ध हाेणार आहे. या संदर्भातील तीन वर्षांच्या संशाेधनानंतर हा पर्याय समाेर आला आहे.बिकानेरमधील स्वामी केशवानंद राजस्थान कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी बडिशेपच्या विविध प्रजातींवर तीन वर्षे संशाेधन करून खाऱ्या पाण्यावरही उत्पादन घेता येणाऱ्या प्रजाती निश्चित केल्या असून, ठिबक सिंचनाद्वारे या प्रजातींचे उत्पादन घेणे श्नय असल्याचे आढळले आहे. खाऱ्या पाण्यात हे पीक किती टिकाव धरते आणि त्याचे उत्पादन किती मिळते या बाबतही अभ्यास केला गेला. त्यानुसार, ‘आरएफ-290’ ही प्रजाती खाऱ्या पाण्याच्या सिंचनातही तग धरू शकत असल्याचे आढळले आहे. राज्याच्या बिकानेर, बाडमेर, नागाैर आणि चुरू या चार वाळवंटी जिल्ह्यांतील शेतीसाठी खारे पाणीच वापरले जाते. या चार जिल्ह्यांत शास्त्रज्ञांनी हे संशाेधन केले.
 
बडिशेपचे शास्त्रीय नाव Foeniculum vulgare असे असून, हे पीक काेणत्याही स्थितीत टिकणारे आणि बारमाही आहे. याची पाने गुच्छेदार असतात. ठिबकसिंचनाद्वारे या पिकाला पाणी देण्याची व्यवस्था केल्यास, त्याचे उत्पादन वाढू शकते. मसाल्यासाठी बडिशेप उपयुक्त असल्याने तिची लागवड करून शेतकऱ्यांना उत्पादन वाढवता येईल, असे या संशाेधनाचे अखिल भारतीय समन्वयक भूपेंद्र सिंह यांनी सांगितले. शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयाेगात बडिशेपचे उत्पादन प्रतिहे्नटर नऊ क्विंटलने वाढल्याचे दिसले. कूपनलिकांद्वारे सिंचन हाेत असलेल्या भागांतही ‘आरएफ-290’ प्रजातीच्या बडिशेपचे उत्पादन घेता येणे श्नय आहे. बिकानेरच्या कृषी संशाेधन केंद्रावर हे प्रयाेग करण्यात आले.राजस्थानच्या या चार जिल्ह्यांतील शेतकरी सध्या प्रामुख्याने जिऱ्याची लागवड करतात. मसाल्यांसाठी जिऱ्याला चांगली मागणी असली, तरी दवाच्या समस्येमुळे हे पीक खराब हाेऊन नुकसान हाेते. त्यामुळे, बडिशेप हा चांगला पर्याय ठरणार आहे.