भारतात खडतर रस्त्यांवरून गाडी चालविण्याचा वाढता ट्रेंड

    01-Jun-2024
Total Views |
 
 


thoughts
काळाबराेबर ट्रेंडही बदलतात. सध्या अवघड भूभागातून गाड्या फिरवण्याचा ट्रेंड आहे. त्याला ‘ऑफ-राेड ड्रायव्हिंग’ म्हणतात. अशा रस्त्यांवर जाण्यासाठी ‘एसयूव्ही’ प्रकारची वाहने वापरली जातात. ताकदवान इंजिन हे या वाहनांचे वैशिष्ट्य असल्याने ती काेणत्याही भूभागातून मार्ग काढतात. मुंबईच्या खारघर या उपनगरातील टाटा मेमाेरियल सेंटरमधून निवृत्त झालेल्या ब्रेस्ट सर्जिकल ऑन्काेलाॅजी या विषयाच्या प्राध्यापिका डाॅ. वाणी परमार (वय 62 वर्षे) यांच्या मते, शस्त्रक्रिया आणि ऑफ-राेड ड्रायव्हिंग यांच्यात साम्य आहे. ‘या दाेन्ही क्षेत्रांत अचूकता, जलद प्रतिक्रिया आणि आव्हानात्मक स्थितीला सामाेरे जाण्याची क्षमता आवश्यक असते,’ असे त्या सांगतात. आजही त्या ब्रेस्ट कॅन्सर सर्जन म्हणून काम करत असल्या, तरी ऑफ-राेड ड्रायव्हिंग हा त्यांचा छंद आहे.
महिंद्र कंपनीची ‘थार’ ही जीप डाॅ. वाणी यांच्याकडे आहे. ‘‘माझ्या ‘थार’ला डांबरी रस्त्यांपेक्षा चिखलातून फिरायला आवडते. या फाेर बाय फाेर जीपमधून ऑफ-राेड ड्रायव्हिंग करण्यामुळे माझा कामाचा ताण जाताे,’’ असे त्या म्हणतात.फाेर बाय फाेर अथवा अवजड गाड्या चालविण्यात पूर्वी पुरुषांची मक्तेदारी हाेती. आता मात्र महिलाही त्यात आल्या आहेत. प्रवासाची आवड असलेल्या नाजी नाैशी (वय 34 वर्षे) म्हणतात, ‘महिलांनी काय करावे आणि काय करू नये याच्या सीमारेषा भारतीय समाजाने आखलेल्या असल्या तरी मला त्या पार करावयाच्या आहेत. मला स्वत:ला आव्हान देणे आवडते.’ कतारमध्ये 2022मध्ये झालेल्या फिफा वर्ल्ड कप फुटबाॅल स्पर्धेसाठी त्या भारतातून एकट्याच ‘थार’ घेऊन गेल्या हाेत्या आणि त्यांच्या या प्रवासाची महेंद्र समूहाचे अध्यक्ष आनंद महेंद्र यांनीही प्रशंसा केली हाेती.
नाजी या ‘साेलाे ऑफ-रायडर’ (एकट्याने फिरणाऱ्या) असून, केरळ आणि आबुधाबीमध्ये त्यांचे वास्तव्य असते. त्या बाहेर असताना पती आणि आई हे दाेघे मुलांची काळजी घेतात.‘एका महिलेला तिच्या आयुष्यात अनेक आव्हानांना सामाेरे जावे लागते आणि त्या पुढे ऑफ-राेड ड्रायव्हिंग हे फार माेठे आव्हान नाही. या ड्रायव्हिंगमध्ये स्त्रीपुरुष असा भेदसुद्धा नाही. आवड मात्र हवी,’ असे त्या म्हणतात. आता लवकरच दुबईहून युराेपमध्ये असा प्रवास करण्याचे नियाेजन त्या करत आहेत.रस्ता साेडून गाडी चालविणे म्हणजे ‘ऑफ-राेड ड्रायव्हिंग’ असे सांगता येईल. रस्ता संपल्यावर त्याचा प्रारंभ हाेताे. सध्या महिला, पुरुष आणि तरुणाईत याची क्रेझ आहे. ज्येष्ठ नागरिकही त्याला अपवाद नाहीत.बर्फाने भरलेले रस्ते, वाळूच्या टेकड्या, निसरडे आणि तीव्र उतार किंवा खडकाळ डाेंगरांमध्ये वाहन चालविण्याचे आव्हान हे लाेक घेतात.
अशा प्रवासासाठी फाेर बाय फाेर वाहने हवीत. यात इंजिन चारही चाकांना ताकद देत असल्याने वाहनाला ट्रॅ्नशन आणि रस्त्यावरील पकड चांगली मिळते. नवीन तंत्रज्ञानावरील अशी वाहने काेणत्याही रस्त्यावरून मार्ग काढू शकतात.‘महेंद्र अ‍ॅडव्हेंचर’ या कार्यक्रमांतर्गत महिंद्र अँड महिंद्र या कंपनीने 2011मध्ये भारतात ऑफ-राेडींगला प्रारंभ ेला. याचे सदस्य लहान आणि माेठ्या अंतराचे प्रवास करतात. ऑफ-राेड ड्रायव्हिंगसाठी प्रशिक्षण घ्यावे लागते. त्या साठी कंपनीने महाराष्ट्रात इगतपुरी येथे आणि जैसलमेर, लडाख, काेडुगू आणि गुरगावमध्ये अकादमी उभारल्या आहेत.देशातील फाेर बाय फाेर एसयूव्हींच्या खपामध्ये महिंद्र कंपनी अव्वल असून, 2022-23मध्ये त्यांनी 60,348 युनिट्सची विक्री केली. मात्र, मारुती सुझुकीची ‘जिम्नी’ ही फाेर बाय फाेर ऑफ-राेड गाडी तसेच टाेयाेटाच्या ‘फाॅर्च्युनर’ने आता स्पर्धा सुरू केली असल्याचे ऑटाेमाेटिव्ह मार्केटच्या क्षेत्रातील जाटाे डायनाम्निस या कंपनीने म्हटले आहे.
या दाेन गाड्यांच्या स्पर्धेमुळे महिंद्रच्या गाड्यांचा खप थाेडा घटल्याचे दिसते. महिंद्र अँड महिंद्रच्या ऑटाेमाेटिव्ह से्नटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनीकांत गाेल्लागुंटा म्हणाले, ‘आमच्या एसयूव्ही गाड्या म्हणजे फक्त वाहने नसून, धाडसाचे प्रवेशद्वारही आहेत. आम्ही ऑफ-राेड ड्रायव्हिंगचे प्रशिक्षणही देताे. त्यातून आमचे ग्राहक आमच्याबराेबर जाेडलेले राहतात.’ साहसाची आवड असलेल्यांसाठी भक्कम बांधणीची आणिताकदवान फाेर बाय फाेर एसयूव्ही गाडी म्हणजे पर्वणीच असते. नेहमीच्या रस्त्यांऐवजी खडतर भूभागांतून वाहन चालविण्याचे आव्हान पेलण्यासाठी याच गाड्या उपयुक्त ठरतात. फाेर बाय फाेर तंत्रज्ञानाच्या गाड्या नेहमीच्या वाहनांपेक्षा वेगळ्या असतात.
त्यांच्या चारही चाकांना ताकद मिळते, जमिनीपासून त्यांची उंची जास्त असते, त्यांना स्कीड प्लेट्स आणि टाेइंग हुक असतात आणि आता आधुनिक ट्रॅ्नशन सिस्टीमही असते. नद्या पार करणे, उंच खडक-दगडांवरून जाणे आणि खडतर चढचढण्यासाठीच ही वाहने बनविलेली असल्याने त्यात या साेई हव्यातच असे ऑफ-राेडींग करणारे म्हणतात.ऑफ-राेड वाहने चालविण्यासाठी विशेष प्रशिक्षण घ्यावे लागत असल्याने ते देणारी केंद्रेही आता सुरू झाली आहेत. ‘इंटरनॅशनल फाेर-व्हील ड्राइव्ह ट्रेनर्स असाेसिएशन’मधून शिकलेले आणि सर्टिफाइड प्रशिक्षक तेजस काेठारी यांनी मुंबईजवळ ‘लर्न ऑफ राेड’ या नावाचे केंद्र सुरू केले आहे. अनेक वाहनचालकांना बेसिक ऑफ-राेडींगसुद्धा माहीत नसते. येथे येणाऱ्यांना प्रथम फाेर बाय फाेर वाहन रस्त्यावर कसे चालवावे याचे शिक्षण दिले जाते.