काॅमिक बुकमधील पात्रांचे सर्वाधिक टॅटू

    01-Jun-2024
Total Views |
 
 

tatoo 
 
काॅमिक बुकमधील पात्रांची आवड असलेले आणि कॅनडाचे नागरिक रिक स्काेलामिराे यांनी शरीरावर अशा 34 सुपर हिराेंचे टॅटू गाेंदवून घेतले आहेत.स्पायडर मॅन, ए्नस मॅन, थाॅर, हल्क आदी सुपर हिराेंचे जनक असलेल्या स्टेन ली यांची सहीसुद्धा रिक यांनी शरीरावर गाेंदवून घेतली आहे. स्टेन ली यांच्या सुपर हिराेंमधून ‘मार्व्हल काॅम्निस’चा प्रारंभ झाला. कॅनडातील अल्ब्रेटा येथे 9 मार्च 2023 राेजी रिक यांच्या शरीरावरील टॅटूंची माेजणी झाली तेव्हा ही संख्या 34 असल्याचे आढळले.अमेरिकेच्या केंटकी या राज्यातील लुइसव्हिले येथील रायन लाॅग्सडाॅन यांच्या शरीरावरही असे 34 टॅटू असल्याचे 3 डिसेंबर 2022 राेजी झालेल्या माेजणीत आढळले. त्या मुळे ‘मार्व्हल काॅम्निस’मधील सर्वाधिक सुपर हिराे शरीरावर गाेंदवून घेणारे म्हणून रायन आणि रिक यांची नाेंद झाली आहे.