ही पथ्ये पाळून अ‍ॅसिडिटीपासून लवकरच हाेईल सुटका

    01-Jun-2024
Total Views |
 
 

health 
 
दीर्घकाळ अ‍ॅसिडिटी असेल तर : अ‍ॅसिडिटी दीर्घकाळापासून असेल तर यामुळे पाेटात व्रण वा सूज असू शकते. इरिटेबल बाउल सिंड्राेम जाे आतड्यांवर परिणाम करताे, मालबसाेर्पशन सिंड्राेम ज्यात शरीर खाद्यपदार्थातून पाेषक घटक शाेषू शकत नाही.अशी करा दिवसाची सुरुवात : जर काेमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात केली, तर अ‍ॅसिडिटीत खूप आराम पडेल. काेमट पाण्यात थाेडीशी मिरपूड व अर्धे लिंबू पिळून राेज सकाळी प्याल्यास फायदा हाेताे.
 
जेवणानंतर : जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यामुळे अ‍ॅसिडिटीत आराम मिळताे. बडीशेप पाेटात गारवा उत्पन्न करून अ‍ॅसिडिटी कमी करते. बडीशेप सरळ चावून वा तिचा चहा बनवून पिऊ शकता. लिंबूपाण्यात थाेडीशी साखर मिसळून प्यायल्यासही अ‍ॅसिडिटी हाेत नाही. लंचच्या काही काळ आधी घेतल्यास जास्त फायदा हाेईल.
 
दूध देईल दिलासा : थंड दूध अ‍ॅसिडिटीसाठी रामबाण उपाय आहे. थंड दुधातील कॅल्शियम अ‍ॅसिडिटीच्या वेदना शांत करते. त्यामुळे जेव्हा पाेटात जळजळ वा गॅसमुळे दुखत असेल, तर थंड दूध घेऊ शकता. मनुके ग्लासभर दुधात उकळून घेतल्यास आम्लपित्त नष्ट हाेते.
 
जीवनशैलीत बदल करा
 
 लवकर झाेपावे व लवकर उठावे. रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे व सकाळी उशिरपर्यंत झाेपून राहिल्यामुळे पित्त वाढते.
 दाेन जेवणात जास्त अंतर नसावे. तळकट तेलकट पदार्थ, बेकरी प्राॅड्नट्स, लाेणचेही टाळावे.
 भरभर जेवण न उरकता आरामात चावून चावून खावे. लहान घास घ्यावेत. जेवताना पाणी पिऊ नये.रिकाम्या पाेटी फळे खाऊ नयेत. बाहेरचे खाणे व फास्टफूड टाळावे. तणावही अ‍ॅसिडिटीचे कारण बनू शकते.
 जेवणात भात, वांगी, बटाटे, काळा हरभरा, बेसन, जास्त आंबट पदार्थ, दही, काॅफी, दुधाचा चहा इ. अ‍ॅसिडिटी वाढवणारे पदार्थ टाळा. भरपूर झाेपा व सकाळी फिरायला जा.