सासरी जाताना नवरीने कसे रडावे, यावर सात दिवसांचा क्रॅश काेर्स

    01-Jun-2024
Total Views |
 
 


Marriage
 
 
नवरीची पाठवणी हा आपल्याकडे तसा एक साेहळाच असताे. मात्र, यावेळी रडण्याची ‘प्राॅपर अ‍ॅ्निटंग’ शिकायची असेल, तर भाेपाळमध्ये असाही एक क्रॅश काेर्स सुरू करण्यात आला आहे. या एक आठवड्याच्या काेर्समध्ये नवरी आणि तिच्या मैत्रिणी सहभागी हाेऊ शकतात. बिदाई किंवा पाठवणी हा तसा ‘सेन्सिटिव्ह’ क्षण आहे, ताे हास्यास्पद हाेऊ नये, हा या काेर्समागचा उद्देश आहे.हा काेर्स भाेपाळच्या राधिका राणीने सुरू केला आहे. हा काेर्स सुरू करण्यामागच्या प्रेरणेबाबत त्यानी सांगितले की, त्या एका लग्नात गेल्या हाेत्या. ‘बिदाई’ची वेळ आली आणि नवरीच्या मैत्रिणींना चिंता पडली की, आता रडायचे कसे? सगळ्या एकमेकींना सांगत हाेत्या- आधी तू सुरुवात कर...
 
त्यानंतर आम्ही तुला ‘फाॅलाे’ करताे. काेणालाच रडू येत नव्हते. यानंतर कसेबसे एका मैत्रिणीने रडायला सुरुवात केली.पण, तिने यावेळी इतकी भयानक ‘ओव्हरअ‍ॅ्निटंग’ केली की नवरी रडण्याऐवजी स्वतःच हसू लागली. सर्व लाेक पाेट धरून धरून हसले आणि सगळे वातावरणच हास्यमय झाले.राधिका राणीने सांगितले की, अलीकडे लग्न कार्याात पाठवणीच्या वेळी रडणे ही सगळ्यात कठीण समस्या झाली आहे. खाणे आणि इतर व्यवस्था तर पैसे देऊनही आपणास मिळू शकतात; पण रडणे हे तर घरच्यालाेकांसाठीच असते.ही समस्या दूर करण्यासाठी हा काेर्स सुरू केला आहे. या काेर्समध्ये ‘बिदाई’च्या वेळी खराेखरच डाेळ्यांमधून पाणी येण्याची कला शिकवण्यात येणार आहे.