बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाच्याअध्यक्षपदी ॲड. राजेंद्र उमाप यांची निवड

    06-May-2024
Total Views |

b 
 
पुणे, 5 मे (आ.प्र.) :
 
राज्यातील वकिलांची शिखरसंघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी पुणे येथील ॲड. राजेंद्र उमाप यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना उपाध्यक्षपदी काम करण्याची दोनदा संधी मिळाली असून, सध्याही ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांना पुन्हा अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. या बार कौन्सिलमध्ये महाराष्ट्र आणि गोवा ही दोन राज्ये आणि दादर-नगर हवेली आणि दिव दमण या दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. दोन लाखांहून अधिक वकील या संघटनेचे सभासद आहेत. त्यांनी यापूर्वी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. ते सध्या आळंदी देवाची येथील श्री संत ज्ञानेेशर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त आहेत. ते चिंचवड देवस्थानचे ट्र्‌‍स्टचेही विश्वस्त आहेत. याशिवाय विविध पदे ते भूषवित आहेत.
 
वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. वकिलांची सुरक्षितता, आरोग्यविषयक आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. बार कौन्सिलचे डिजिटलायझेशन करण्यावर भर असणार आहे. प्रत्येक बार असोसिएशनला बार कौन्सिलच्या योजना लवकरात लवकर माहित होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. वकील अकादमीसाठी जागा मिळाली आहे. त्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बार कौन्सिलच्या वतीने 2020 पासून झालेल्या नवीन वकिलांचे मोफत मेडिक्लेम आणि अपघात क्लेम काढण्यात येत आहेत.
                                                      -ॲड. राजेंद्र उमाप, (नवनिर्वाचित अध्यक्ष, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा).