पुस्तके अंतरंगात मुरवणे महत्त्वाच

    05-May-2024
Total Views |
 
 
 

book 
पुस्तक वाचनावरील फ्रान्सिस बेकनचा निबंध अतिशय प्रसिद्ध आहे. त्यात ताे लिहिताे, काही पुस्तके वाचायची असतात. काही वाचून, चघळून रवंथ करीत पचवायची असतात, काही पुस्तके अंतरंगात मुरवणे महत्त्वाचे असते. हे अगदी खरे आहे. आजच्या साेशल मीडियाच्या आणि दिवस रात्र स्क्रीनसमाेर राहणाऱ्या माणसांना पुस्तकांबद्दल आणि एकूणच वाचनाबद्दल काय वाटत असेल...जगातला एक श्रीमंत माणूस एलाेन मस्क हा तेल्सा अ‍ॅन्ड स्पेसएक्स कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी अफाट वाचनासाठी प्रसिद्ध आहे. तरुणाईला तर हे माहिती पाहिजे.ताे वाचनवेडा आहे. त्याने राॅकेटचे तंत्र केवळ पुस्तके वाचून आत्मसात केले असे नाही, तर एडन एम बॅन्कच्या विज्ञान कादंबऱ्या वाचून ड्राेनशस्त्रे वाहून नेणाऱ्या विमानांना त्याच्या कादंबऱ्यांची नावेही दिली.
 
नुकतेच त्याने सांगितले की, विल्यम बाेलिथाेचे एक गूढरम्य पुस्तक त्याला आवडले. त्याचे नाव हाेते देवांचे बारा वैरी (1929). हे पुस्तक रूढीविराेधी प्राणपणाने लढणाऱ्या डझनभर धाडसी व्यक्तींविषयी आहे. मस्कने सर्वांत जास्त आवडलेल्या पुस्तकात जेआरआर टाेस्किनच्या लाॅर्ड ऑफ द रिंगला अग्रक्रम दिला आहे. ही पसंती त्याने या ग्रंथाने एक मार्गदर्शक तत्त्व मनावर ठसवले म्हणून दिली आहे. ते तत्त्व म्हणजे यक्षप्रश्न काेणते ते शाेधायचे ठरवणे आणि ते ठरवता आले म्हणजे ते साेडवणे शक्य हाेते.तुम्ही जगातल्या काेणत्याही क्षेत्रातील यशस्वी आणि महत्वाच्या व्य्नतींची यादी काढून पाहा. त्याचं वाचन हे जास्त आहेच! वाचनाला पर्याय नाही हे खरेच !