गॅस पास हाेण्याची तक्रार दूर करण्याचे उपाय

    04-May-2024
Total Views |
 
 
 

health 
अनेक लाेकांना वाटते की गॅसेस पचनक्रियेतून जात असतात. परंतु असे नसते. जे गॅसेस आतड्यांच्या वरच्या भागात व पित्ताशयात निर्माण हाेतात ते ढेकराच्या माध्यमातून बाहेर पडतात. अपानवायू आतड्यांमध्ये निर्माण हाेऊन गुदद्वारातून आवाज करीत बाहेर पडताे.
 
कारण व जाेखीम : काही लाेकांमध्ये कमी, तर काहींमध्ये जास्त गॅसेस पास हाेत असतात. हे प्रमाण वैयक्तिक प्राथमिकतेशी आणि सवयींशी निगडित असते. काहीजण पाेटातील गॅसेसबाबत खूपच संवेदनशील असतात. हा त्रास दूर करण्यासाठी ते अनेक प्रयत्न करीत असतात. अनेकजणांना आतड्यांच्या खालच्या भागात हाेणारी गॅसेसची गुडगुड आवडत नसते आणि मलत्याग करण्याचा स्वत:कडून प्रयत्न करतात.संशाेधन सांगते की, आम्ही एका दिवसात शंभराहून जास्त वेळा अपानवायूपासून मुक्ती मिळवत असताे. फरक एवढाच असताे की, बहुतेक लाेकांचे गॅसेस आवाज न करता ठुसकीच्या रूपात बाहेर जात असतात. बाहेर पडणाऱ्या गॅसेसचे प्रमाणही खूप कमी असते, त्यामुळे ते इतरांना कळत नसतात.
 
खाताना ढेकर येणे : आपण खाताना हवाही गिळत असताे. ज्या लाेकांना जास्त तणाव, हायपरव्हेंटिलेशन, नाक वाजण्याचा असाध्य आजार असताे वा दातांशी संबंधित एखादी समस्या असते, त्यांना जास्त गॅसेस हाेत असतात. यामध्ये पाेटात व्रण हाेणे, बद्धकाेष्ठता राहणे, इरिटेटिंग बाॅवेल सिंड्राेम, एखाद्या विशिष्ट प्रकारच्या पदार्थाचे अपचन हाेणे व दुधाचे पदार्थही सामील आहेत.असे काही जे पाेटात गेलेल्या आहाराचे विखंडन राेखते व ते न पचवता खालच्या आतड्यात शाेषित हाेण्यासाठी साेडणे यामुळे तिथे गॅसेस जास्त हाेतात. उदाहरणार्थ अनेक लाेकांना दूध पचत नसते कारण त्यांच्या आतड्यांमध्ये दुधाच्या विखंडनासाठी हवे असलेले एंझाइम नसतात.अशावेळी दूध माेठ्या आतड्यात पाेहाेचते. येथे त्यांचा सामना माेठ्या प्रमाणात असलेल्या बॅ्नटेरियांशी हाेताे, जे शरीराचे मित्र असतात. येथे बॅ्नटेरियाच्या उपस्थितीत दूध नासू लागते, ज्यामुळे माेठ्या प्रमाणात गॅसेस निर्माण हाेतात. यामुळे मुरडाही हाेऊ लागताे.
 
यामुळे वाढतात गॅसेस : अनेकजणांना काही विशिष्ट प्रकारचे पदार्थ पचत नसतात व ते माेठ्या आतड्यात सडू लागतात. यामुळे माेठ्या प्रमाणात अपानवायूची निर्मिती हाेते. यामध्ये गवार, वाटाणा व अनेक प्रकारच्या डाळीही असतात. यांच्यामध्ये कठीण कार्बाेहायड्रेट्स असतात. जे विखंडित न हाेता माेठ्या आतड्यात सरकतात. मसालेदार पदार्थांमुळेही गॅसेस हाेतात. काेबी, फ्लाॅवर, सिमला मिरची, मुळ्याच्या पानांची भाजी इ.मुळे जास्त गॅसेस हाेतात. या भाज्या पचल्यानंतरही माेठ्या प्रमाणात अपानवायू विसर्जित हाेत असताे. तसेच जे पेय साेड्यापासून बनलेले असते वा झाकण उघडताच ग