काेचिंग ्नलासला पाठविण्यापूर्वी जाणून घ्या

    04-May-2024
Total Views |
 
 

class 
 
मुलांची रुचीसंध्यानंद.काॅम उत्तम आणि उच्च दर्जाच्या शिक्षणामुळे उज्ज्वल भवितव्याचा मार्ग खुला हाेत असला, तरी ताे साेपा नाही.लहान वयापासून त्याची तयारी करावी लागते. सध्याच्या काळात काेचिंग ्नलासेस त्यासाठी मार्गदर्शन करतात आणि राजस्थानातील काेटा हे शहर त्यामुळे प्रसिद्धीला आले आहे.डाॅ्नटर अथवा इंजिनीअर हाेण्याचे स्वप्न घेऊन दर वर्षी देशभरातून सुमारे दीड लाख मुली-मुले येथे येत असली,तरी त्यातील माेजकीच यशस्वी हाेतात. म्हणजे, येथे येणे हा यशस्वी हाेण्याचा मापदंड नाही.स्पर्धेच्या या काळात दबाव हा घटक फार महत्त्वाचा ठरताे आणि सगळी मुले त्याचा सामना करू शकत नाहीत. ताे असह्य हाेऊन काही मुले आत्महत्याही करतात.
 
एवढे टाेकाचे पाऊल उचलावेसे वाटण्याएवढा हा दबाव काय असावा, असा प्रश्न पडताे. डाॅ्नटर अथवा इंजिनीअर हाेण्याव्यतिरिक्त आणखी काही पर्याय निवडावेत असे या मुलांना का वाटत नाही? अन्य क्षेत्रांतही करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध असताना ही मुले त्यांचा विचार का करत नाहीत? करिअरच्या पर्यायांबाबत नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून समाेर आलेली माहिती त्यावर प्रकाश टाकते. 93 टक्के विद्यार्थी फक्त सात करिअर पर्यायांचा विचार करत असल्याचे त्यातून दिसले.डिजिटल मंचांमुळे मुलांपुढे अनेक पर्याय येत असले, तरी पालकांच्या मानसिकतेत फार बदल झाला नसल्याचे हे सर्वेक्षण सांगते.
 
1) मेहनतीला पर्याय नाही आयआयटी मुंबईतून केमिकल इंजिनीअरची पदवी घेतलेले आणि सिंगापूरमधील बाेस्टन कन्सलटिंग ग्रुपमध्ये प्राेजे्नट लीडर या पदावर काम करणारे अनुराग रवी शर्मा म्हणतात, ‘मला राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीमध्ये (छऊअ) जाऊन संरक्षण दलांतील अधिकारी व्हायचे हाेते. पण, मी इंजिनीअर व्हावे अशी इच्छा असल्याने वडिलांनी मला काेट्यात पाठविले. काेचिंग ्नलासमधील शिक्षकांना अभ्यासक्रम पूर्ण करण्याची घाई असल्याने ते खूप वेगात शिकवतात आणि ती गती विद्यार्थ्यांनाही आत्मसात करावी लागते. त्यासाठी मी मित्रांसाेबत ग्रुप स्टडी करत हाेताे.एकट्याने अभ्यास करणाऱ्यांना असा आधार मिळत नाही. अभ्यासात मागे पडलेल्यांना मदत करण्याएवढा वेळ काेणाकडे नसताे. येथे आल्यावर मेहनतीला पर्याय नाही हे
 
कमी वयामुळे अल्प समज : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचे वय 15-17 वर्षांदरम्यान असते.मनाेविकार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे वय संप्रेरकांतील बदलांबराेबरच शारीरिक आणि मानसिक विकासाचे असते. या स्थितीत एकटे राहणे, कुटुंबीयांच्या अपेक्षा, दरराेज 13-14 तासांचा अभ्यास, चुरशीच्या स्पर्धेचा दबाव आणि त्यामुळे येणाऱ्या चिंता यांचा या मुलांवर दबाव येताे. हे ताण सहन करणे साेपे नसते आणि आपली प्रगती चांगली झाली नाही तर काय, या चिंतेत दर दहांपैकी दाेन मुले सापडतात. सर्वांना एवढा ताण सहन करणे जमत नाही.असा असताे दिनक्रम : काेटा शहरात दाखल झालेल्या मुलांचा दिनक्रम वेगळा आणि व्यस्त असताे.‘नीट’ परीक्षेच्या तयारीसाठी दाेन वर्षांपासून येथे राहत असलेल्या मानसी सिंह यांच्या म्हणण्यानुसार, तणाव हा येथील अपरिहार्य भाग आहे.