मुलांना शिक्षा करण्यासाेबतच बक्षीसही द्या

    04-May-2024
Total Views |
 
 

child 
 
मुलांच्या उत्तम व्यक्तिमत्व निर्मितीत पालकांची भूमिका महत्त्वाची असते. ते जर आपल्या मुलांसाठी थाेडा वेळ आवश्यक रूपात काढून त्यांना याेग्य मार्गदर्शन करीत राहिले तर त्यांची मुले त्यांच्यासाठी अभिमानाची गाेष्ट हाेईल. सामान्यत: असे दिसून येते की, पालक मुलांच्या काेणत्याही गुण वा अवगुणांची जबाबदारी मुलांवरच टाकतात आणि स्वत:च्या भूमिकेविषयी विचारही करण्याचा त्रास घेत नाहीत.एका विशिष्ट वयानंतर मूल ज्याप्रकारच्या व्यक्तिमत्वाकडे वळते, नंतर त्यात काेणताही खास बदल हाेऊ शकत नाही. मुलाच्या सवयी, विचार व प्रवृत्तीचे जे रूप या काळात उभारते तेच एक प्रकारे कायमचे असते.याच काळात पालकांनी याेग्य मार्गदर्शकाची भूमिका बजावण्याची गरज असते. पालकांना मुलाच्या नैतिक व चारित्रिक विकासासाठी प्राेत्साहन देत त्यांना प्रेम आणि जिव्हाळाही द्यायला हवा.
 
त्याच्या चुकीच्या सवयी वा कामाबद्दल कडक धाेरणही अवलंबायला हवे.बक्षीस व शिक्षेत असे संतुलन असायला हवे की, मुलामध्ये आई-वडिलांविषयी गैरसमज वा बंडाची भावना निर्माण हाेणार नाही व त्याला त्याच्या चुकीची जाणीवही हाेईल. बहुतेक पालक अनावश्यक रूपात आपल्या मुलांचे एवढे लाड करतात की ते हट्टी व अडेल प्रवृत्तीचे हाेतात. याउलट काही पालक मुलांना शिक्षा करण्याऐवजी मारहाण करू लागतात.मानसशास्त्रज्ञांच्या मते शिक्षा केल्याने मुलांमध्ये विकृती निर्माण हाेतात. त्यांच्या मते मुलांना काेणत्याही चुकीसाठी शिक्षा करू नये. व्यवहारी जीवनात हे मत बाेथट ठरते कारण हे मुलांना स्वच्छंद देण्यास सांगते.अशा प्रकारचा स्वच्छंदीपणा जर मुलांना दिला तर ते विपरीत स्थितींमध्ये स्वत:ला टिकवून ठेवण्याची क्षमता मिळवण्यापासून वंचित राहतात. मुलाला हेही समजावण्याचा प्रयत्न करायला हवा की, त्यांना ज्या कामाबद्दल शिक्षा दिली जात आहे ते कशाप्रकारे त्याच्या नजरेत चुकीचे आहे.