जगातून हळूहळू लुप्त हाेत आहेत अनेक भाषा

    04-May-2024
Total Views |
 
 
 

Language 
 
एका अभ्यासानुसार, जगात सध्या 6800 भाषा बाेलल्या जातात. यातील 80 टक्के भाषा अशा आहेत, की त्या बाेलणाऱ्यांची संख्या एक लाखापेक्षा कमी आहे. तसेच 537 भाषा अशा आहेत, ज्या बाेलणाऱ्यांची संख्या पन्नासपेक्षा कमी आहे. जगात 46 भाषा अशा आहेत, ज्या बाेलणाऱ्यांची संख्या फक्त एक आहे. या भाषांचे अस्तित्व धाेक्यात आले आहे. तिचे आयुष्य ती बाेलणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्याइतकेच आहे. त्या माणसाचा मृत्यू झाला, की ती भाषा मृत झाली.जगात सगळ्यात जास्त बाेलली जाणारी भाषा काेणती असे विचारले तर तुम्ही उत्तर द्याल, इंग्रजी.पण नाही, सगळ्यात जास्त बाेलली जाणारी भाषा चीनची मंडरीन आहे. इंग्रजीचा नंबर दुसरा आहे.
 
आपल्या भारतातील हिंदी भाषेचा नंबर जगात सहावा येताे. हिंदीपेक्षा अरबी व हसपनवी भाषा बाेलणारे अधिक आहेत, तिसरा व चाैथा नंबर या दाेन भाषांचा आहे. विशेष म्हणजे पाचवा नंबर बांगला भाषेचा आहे. उर्दू भाषेचा नंबर जगात बाविसावा आहे.एका अभ्यासानुसार 32 काेटी लाेकांची भाषा इंग्रजी आहे. इंग्रजी भाषा बाेलणारे लाेक मुख्यत्वे अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे आहेत. याशिवाय 35 काेटीलाेक असे आहेत, ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही, पण ते इंग्रजी भाषा बाेलतात. तसेच 15 काेटी लाेक असे आहेत, ज्यांना स्वत:च्या गरजेसाठी इंग्रजी भाषा बाेलावी लागते.इंटरनेट, टीव्ही आणि कम्युनिकेशन माध्यमामुळे इंग्रजीचा वापर सतत वाढताे आहे. इंटरनेटवर सर्वांत जास्त इंग्रजीचा वापर हाेताे.जगात अनेक भाषा अनेक भागात विखुरल्या आहेत. जगातील भाषातज्ज्ञ भाषांचे दहा भाग पाडतात. या दहा भागांमध्ये मुख्य चार भाग आहेत :
 
1. इंडाे युराेपियन समूह.
 2. सायानाे तिबेटीयन समूह.
3. आफराे एशिएटिक समूह.
4. द्रविडियन समूह.
 
भाषांमध्ये सर्वांत माेठा पहिला इंडाे युराेपियन समूह आहे. इंग्रजी, हिंदी, बांगला, पंजाबी आणि फारसी या समूहात आहेत. तसेच संस्कृत आणि लॅटिन भाषा या समूहात आहेत.जगात सर्वांत जास्त बाेलली जाणारी मंडरीन सायानाे तिबेटीयन समूहात आहे. चीन व तिबेटमध्ये बाेलली जाणारी ही भाषा आहे. तसेच ब्राह्मी भाषाही यात येते. या समूहातील सर्व भाषा जवळजवळ सारख्या आहेत. यातील काही शब्द असे आहेत, जे उच्च स्वरात बाेलले व हळू बाेलले तर त्यांचे अर्थ वेगळे हाेतात.
 
आफराे एशियाटिक समूहामध्ये आरामी, असेरी, सुमेरी, आकादी, केनयनी आणि अन्य आफ्रिकन भाषा समाविष्ट आहेत. यातील मुख्य भाषा अरबी व इराणी आहेत. भाषेच्या चाैथ्या द्रविडियन समूहामध्ये भारतातील दक्षिणेतील राज्यात बाेलल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे. दक्षिण भारत व श्रीलंकेमध्ये 26 भाषा बाेलल्या जातात. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या मुख्य भाषा आहेत. या भाषा स्वतंत्र आहेत. हिंदी व उर्दू भाषेचा संबंध जर्मन भाषेशी लागू शकताे, पण मल्याळम भाषेशी नाही.हिंदी व इंग्रजी भाषेचा संबंध घनिष्ठ आहे. दाेन्ही भाषेतील अनेक शब्द एकमेकांमधून घेतलेले आहेत.