उपाययाेजनांतील सातत्याने अचूक वीजबिलाची ट्नकेवारी वाढली

    04-May-2024
Total Views |
 
 

CM 
 
गेल्या आर्थिक वर्षभरात द्वैमासिक आढावा व उपाययाेजनांतील सातत्याने पुणे परिमंडलात अचूक वीजबिलांच्या प्रमाणात वाढ झाली असून, सद्यस्थितीत 95.43 ट्नके ग्राहकांना अचूक बिल देण्यात येत आहे. त्यात पुणे व पिंपरीचिंचवड शहरातील अचूक बिलिंगचे प्रमाण 97 ट्न्नयांपेक्षा अधिक आहे.अचूक बिलिंगमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी प्रामुख्याने ग्रामीण भागात शाखा कार्यालयनिहाय कृतिआराखडा तयार करून स्थानिक उपाययाेजना कराव्यात, असे निर्देश मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिले.
रास्ता पेठेतील प्रकाशदूत सभागृहात मीटर रीडिंगचे बिलिंग व फाेटाे मीटर रीडिंगबाबत द्वैमासिक आढावा बैठक झाली. तीत पवार बाेलत हाेते. यावेळी अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठाेड, सहायक महाव्यवस्थापक (वित्त) माधुरी राऊत यांच्यासह सर्व 77 मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक, व्यवस्थापक; तसेच सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता, वित्त व लेखा अधिकारी उपस्थित हाेते.
 
पुणे परिमंडलात 100 ट्नके अचूक बिलिंगचे लक्ष्य समाेर ठेवून विविध उपाययाेजना सुरू आहेत. त्यामुळे अचूक बिलिंगचे प्रमाण मार्च 2024 अखेर 95.43 ट्न्नयांवर गेले आहे; तसेच मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी वीजबिलांत 1.16 ट्न्नयांनी, तर मीटर रीडिंगच्या अस्पष्ट फाेटाेच्या प्रमाणात 1.36 ट्न्नयांनी घट झाली आहे.वीजमीटरच्या अचूक रीडिंगसाठी पुणे परिमंडलाकडून दैनंदिन पर्यवेक्षण करण्यात येत आहे. उपविभाग कार्यालयांकडून दरमहा मीटर रीडिंगच्या फाेटाेची 100 ट्नके तपासणी करण्यात येत आहे.साेबतच बिलिंगमध्ये सातत्याने सुधारणा करण्यासाठी व विविध उपायाेजनांच्या अंमलबजावणीसाठी परिमंडल स्तरावर द्वैमासिक आढावा घेण्यात येत आहे.
 
अचूक मीटर रीडिंग हा बिलिंगचा आत्मा आहे. अचूक बिलिंगमध्ये सुधारणा हाेत आहे, ही समाधानाची बाब असली, तरी प्रामुख्याने ग्रामीण भागात स्थानिक उपाययाेजनांना आणखी गती दिली पाहिजे. यासाठी संबंधित विभाग व उपविभाग कार्यालयांची जबाबदारी महत्त्वाची आहे.ग्रामीण भागात मागील वर्षाच्या तुलनेत 2.78 ट्न्नयांनी अचूक बिलिंग वाढले आहे. सरासरी वीजबिलांचे प्रमाणही 3.20 ट्न्नयांनी कमी झाले. मात्र, यापुढे आणखी सुधारणेसाठी शाखा कार्यालय स्तरावर कृतिआराखडा तयार करून उपाययाेजना कराव्यात; तसेच चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना हाेणारा नाहक मनस्ताप व महावितरणच्या महसुलाचे नुकसान हाेऊ देऊ नये, असे पवार यांनी स्पष्ट केले.