तांत्रिक प्रगतीचा वापर तारतम्याने करणे हिताच

    30-May-2024
Total Views |
 
 

thoughts
आजच्या आधुनिक युगात माणसाला वेळेवर नियंत्रण मिळवायचे आहे. तंत्रज्ञानावर स्वार हाेऊन अतिवेगाने पळणारा माणूस कधीकधी दिशा चुकताे, तर कधी कधी त्याला वेळेचे भान राहत नाही. तास न् तास टीव्हीपुढे बसून एका चॅनेलवरून दुसऱ्या चॅनेलवर जाताना कितीतरी वेळ जाताे. किती तरी ‘माेबाइलवेडे’ सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत माेबाइलमध्ये बुडून गेलेले असतात.
लहान असताना व्हिडिओ गेम्सचे व्यसन लागते आणि माेठेपणीदेखील माेबाइलच्या व्यसनापासून सुटका मिळत नाही. त्यानंतर नेट सर्फिंग सुरू हाेते आणि अशारीतीने दिवसाचा बहुतेक वेळ काॅम्प्युटरवर जाताे.ही साधने जीवनासाठी अत्यंत उपयाेगी आहेत हे 100 टक्के खरे; परंतु ती व्यक्तीच्या वेळेवर आक्रमण करतात हेही तेवढेच सत्य असल्याने याविषयी जागरूक असणे गरजेचे आहे.
कधी कधी वाटते, की आपल्याकडे काम करण्यासाठी 24 तास आहेत, मग का काळजी करायची? एवढ्या वेळात तर सगळी कामे पूर्ण हाेतील. पण जसा वेळ जाताे तसे कळते की, वेळेची गिणती चुकीची हाेती. राेजची दिनचर्या, व्यायाम, रात्रीचा आराम, ट्रॅफिकमध्ये लागणारा वेळ, भाेजन, फाेन या सर्वांचा विचार केल्यानंतर लक्षात येते, की आयुष्यात कधीही काम करण्यास 24 तास मिळत नाहीत. कामाचे तास फक्त सात ते आठ तासच असतात आणि ते खूप महत्त्वाचे असतात.यातील प्रत्येक क्षणाला किंमत असते. यासाठीच लाॅर्ड चेस्टरविले याने आपल्या मुलास पाठविलेल्या पत्रामध्ये ‘तू मिनिटांचा विचार कर, कारण तास स्वत:च स्वत:ची काळजी घेताे,’ असा उपदेश केला हाेता.पण, काेणी खरेच मिनिटांची चिंता करताे का? वेळेवर स्वार हाेताे; पण लगाम सैल साेडलेला असताे.
काही जण एखाद्या कार्यक्रमाला जाण्यासाठी घरातून निघलेले असतात, पण वेळेत पाेहाेचू शकत नाहीत. काही जण सकाळपासूनच माेबाइलमध्ये बिझी हाेऊन स्वत:चे दिवसाचे वेळापत्रक बिघडवून टाकतात. काही जण विचार करतात, की काम करण्यासाठी तर आख्खे आयुष्य पडलेले आहे, तर उगाच कशाला घाई करायची? जणू आयुष्यावर ह्यांची सत्ता चालते. अशा प्रकारे हे बेफिकीरपणे वागत असतात. असा फालतू वेळ घालविणारे नंतर अपयशाची काही तरी कारणे देत बसतात.‘मला खरे म्हणजे बँक मॅनेजर बनायचे हाेते, पण मी अपयशी ठरलाे,’ किंवा ‘माझी इच्छा टाटा किंवा अंबानींप्रमाणे उद्याेजक बनण्याची हाेती, पण जमले नाही,’ अशी ही हास्यास्पद कारणे असतात. अशा लाेकांकडे माेठी स्वप्ने असतात, परंतु ते साकार करण्यासाठी काही कालबद्ध कार्यक्रम नसताे.
राेजच्या चिंतेमध्ये गर्क राहायचे आणि वेळ वायफळ कामांसाठी घालवायचा एवढेच हे लाेक करतात.सध्याच्या युगातील सर्वांत माेठा प्रश्न हा आहे, की ह्यांना ‘सायबर सिक’ व्हायचे आहे की ‘सायबर डिसिप्लिन’ पाळायची आहे हा. या संदर्भात वेळ हा एक कुशल शिक्षक आहे. तुमची शिस्तबद्धता जरूरी आहे. महात्मा गांधीजींची दिनचर्या पाहिली, की तुम्हाला कळेल ह्यांनी वेळेचा सदुपयाेग किती चांगल्या प्रकारे केला आहे. सरदार पटेल कमी बाेलत आणि काम झाले की उठून उभे राहत. जे काळाचे महत्त्व ओळखतात ते स्वत:च्या जीवनास गतिशील ठेवतात. ते कधीच वेळेचा अपव्यय करत नाहीत, कारण ते जाणतात, की एकदा गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून वेळेचे नियमन करणे गरजेचे आहे, वेळ वाया घालवू नये.
सामान्य माणूस आणि समर्थ माणूस यातील फरक हा आहे, की एक वेळेवर नियंत्रण मिळवताे आणि दुसरा वेळेबराेबर वाहत जाताे. त्यामुळे, वेळेचे महत्त्व जाणून त्याचा सदुपयाेग करणे सर्वांत महत्त्वाचे ठरते. भूतकाळातील वेळेला साेन्याचे दिवस म्हणून आपण आठवताे, पण ती वेळ पुन्हा आणू शकत नाही. भूतकाळातील गाेड आठवणी वारंवार उगाळल्या जातात, परंतु त्यावर जगता येत नाही! थाेडा वेळ ते दिवस जरूर आठवा, पण नेहमी ते आठवत राहायचे नाही. कारण ताे गेलेला काळ असताे.भविष्यातील काळ ही कल्पना असते, फक्त वर्तमान काळ हीच वास्तविकता असते. म्हणून वेळेचे परिणामकारक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. राेजच्या कामाचे वेळापत्रक केले पाहिजे.
आजचे काम आजच केले पाहिजे. एखादे काम उद्यावर ढकलले तरी हरकत नाही, पण दुसऱ्या दिवशी ते नक्की केले पाहिजे. ‘टाइम इज मनी,’ हे बेंजामिन फ्रँकलिनचे वा्नय या संदर्भात लक्षात ठेवले पाहिजे. ताे सतत काम करायचा. साबण आणि मेणबत्ती बनवणाऱ्या आपल्या पित्याच्या 17 मुलांपैकी ताे दहावा मुलगा हाेता. बाराव्या वर्षी स्वत:च्या भावाच्या छापखान्यात ताे कारागीर म्हणून काम करू लागला. एका आयुष्यात अनेक आयुष्यांतील कामे याने केली, कारण त्याने स्वत:च्या वेळेवर नियंत्रण मिळवले हाेते.माणसाला आयुष्याची लढाई खेळावीच लागते. ‘नाटकाच्या स्टेजवर आपल्याला एक तास मिळताे आणि त्या एका तासात आपल्याला सर्व काही बाेलायचे असते,’ असे विल्यम शे्नसपियरने म्हटले आहे. ते लक्षात ठेवा आणि प्रत्येक क्षणाचा सदुपयाेग करून जीवन समृद्ध करा.