स्वत:त व्यावहारिक बदल करून आनंद मिळवता येऊ शकताे

    30-May-2024
Total Views |
 
 

health 
 
कधीही नकारात्मक विचारांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्यामुळे ते जास्त परिणाम करतात.यासाठी त्रासाचा स्वीकार करा. त्याला आव्हान द्या.जेव्हा आपण अपयशी हाेत आहे, असे वाटेल तेव्हा फक्त हा एक टप्पा आहे असे समजा. नकारात्मक विचार लिहून त्यांना काउंटर करा. जाणून घ्या आनंद कसा मिळवू शकताे ते.आनंद अशा प्रकारे बनवू शकता सवयीचा मेंदूशी संबंधित चार तंत्रे
 
♦ मित्राप्रमाणे सल्ला द्या : कठीण परिस्थितीत स्वत:ला मित्राप्रमाणे सल्ला द्या. आपण एखाद्या मित्राला सल्ला देत आहाेत असे समजा. आता ते स्वत:वरही लागू करा.
 
♦ प्राणायाम करा : विज्ञानाने अनेक संशाेधनांतून याची पुष्टी दिली आहे की, श्वास नियंत्रणाचे तंत्र म्हणजेच प्राणायामाने तणाव, नैराश्य, निद्रानाश दूर हाेताे.
 
♦ आपली गाेष्ट लिहा : वैयक्तिक अनुभव लिहिल्यामुळे व्यावहारिक बदल हाेत असतात. लिहून स्वत:ला व्यक्त केल्यामुळे मूड ठीक हाेत असताे. आपले संघर्ष लिहा.
 
♦ शक्य असेल तेवढे चाला : खूप जादा व्यायामच करावा असे नाही. थाेडेसे िफरणेही उत्तम मूडसाठी पुरेसे असते. जेवढे शक्य असेल तेवढे चाला.
 
बदलासंबंधित तीन गाेष्टी
 
♦ निसर्गाच्या सान्निध्यात जा : जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा बाहेर मैदानात जा. झाडाखाली बसा.गवतावर चाला. दिवसा खिडक्यांमधून नैसर्गिक प्रकाश जास्त येऊ द्या.
 
♦ नीटनेटके राहा : वस्तूंचे ओझे कमी करा.डिक्लटरिंग अत्यंत आवश्यक आहे. आपले वर्कस्टेशन, घर आणि आपला आवडता काॅर्नर नेहमी स्वच्छ ठेवा.
 
♦ छाेटे काम वेगाने करा : ‘हॅपिनेस अ‍ॅट हाेम’ची लेखिका मिस रुबिन एक मिनिटाचा रामबाण उपाय सांगते.एक मिनिटात पूर्ण हाेणारी कामे करा. उदा. कपड्यांच्या घड्या घालणे, आवश्यक मेसेज-मेल देणे इ. हे हॅपिनेसचे छाेटे बूस्टर असतात. लहानात लहान अचिव्हमेंटही मनाला आनंद देते. ते उत्तम करण्यासाठी प्रेरित करीत असते.आनंदी मित्र नऊपट आनंद वाढवतात : रिसर्च सांगताे की, आपला आनंद इतरांच्या आनंदाशी निगडित असताे. आनंदी हसतमुख लाेकांसमवेत वेळ घालवा.