अमेरिकेतील डायनाची नखे आहेत 13 मीटर लांब

    30-May-2024
Total Views |
 
 


health
 
 
एका अमेरिकन महिलेने तिची नखे 25 वर्षे कापली नाहीत. या महिलेची नखे सुमारे 13 मीटर वाढली आहेत. यामुळे या नखांचा जगातील सर्वांत अनाेखा विक्रम रचला असून, या विक्रमासाठी तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्येही नाेंदवले गेले आहे. नखांचा विक्रम करणारी ती पहिली महिला ठरली आहे. तिच्या सर्व 10 बाेटांच्या नखांची लांबी दुहेरी बसच्या 42 फूट 10 इंच इतकी आहे. डायना आर्मस्ट्राँग असे या महिलेचे नाव असून, ती अमेरिकेची रहिवासी आहे.या महिलेचे म्हणणे आहे की, नखांमुळे तिला समस्यांना सामाेरे जावे लागतेय.परंतु, ती त्यांच्यासाेबत ती सामान्य जीवन जगत आहे.
 
63 वर्षीय डायनाने सांगितले की, 25 वर्षे नखे न कापण्याचे कारण म्हणजे तिची मुलगी लतीसा हिचा मृत्यू 1997 मध्ये झाला हाेता. लतीसा दर महिन्याला मॅनिक्युअर करून घ्यायची.डायनाने तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधी लतीसाची नखे स्वच्छ केली हाेती आणि दुसऱ्या दिवशी तिची तब्येत अचानक बिघडल्याने तिचा झाेपेतच मृत्यू झाला. म्हणूनच डायनाने आजपर्यंत नखे कापली नाहीत.मात्र, यासाठी त्यांना अनेक त्याग करावे लागले. या लांब नखांमुळे तिला गाडी चालवता येत नाही. डायनाची नखे 2022मध्येच जमिनीला स्पर्श करू लागली. डायना या नखांना वेगवेगळ्या रंगांनी रंगवते. नखे न कापण्याचा निर्णय घेऊन आपल्या मुलीला श्रद्धांजली वाहिल्याचे डायनाने म्हटले आहे.