माधुरीसाठी वाट्टेल ते!

    30-May-2024
Total Views |
 
 
 

Madhuri 
उत्सव सिनेमातून साक्षात रेखासाेबत नायक म्हणून पदार्पण करणाऱ्या शेखर सुमनविषयी हिंदी सिनेमावाल्यांमध्ये कमालीची उत्सुकता हाेती.मात्र, ताे सिनेमा रखडला, त्याच्यासाठी अ‍ॅडव्हान्स मिळालेले 10 हजार रुपये खर्च झाले आणि सिनेमा रिलीज झालेला नसल्याने शेखरला पुढे कामही मिळेना. अशात त्याच्याकडे एक प्रस्ताव आला, ‘मानव हत्या’ नावाच्या सिनेमाचा. प्राेड्युसर फारच कडका हाेता. उत्सवसाठी 25 हजार रुपये मानधन घेणाऱ्या शेखरला त्याने या सिनेमासाठी फक्त पाच हजार रुपये देऊ केले हाेते. पण तेव्हा गरज हाेती.शेखरने तेवढ्यावर सिनेमा स्वीकारला.
 
मग त्याला कळलं की काेणी माधुरी दीक्षित नावाची मराठी मुलगी नायिका आहे. तिच्या घरी सगळे गेले. तिचं साैंदर्य पाहून शेखर थक्क झाला. निर्माता म्हणाला, आपल्याकडे बजेट नाही. तुमच्या घरात करू या का शूटिंग? शेखरने त्याला हाेकार दिला. मग निर्माता म्हणाला, माधुरीला आणायला गाडी नाहीये आपल्याकडे. तुम्ही तुमच्या माेटरसायकलवरून आणाल का तिला शूटिंगला? शेखर यालाही (अर्थात आनंदानेच) तयार झाला.शूटिंगची तयारी झाल्यावर निर्माता म्हणाला, तिच्यासाठी कपडे बनवायचं बजेट नाही आपल्याकडे. तुमच्या बायकाेचे कपडे द्याल का तिला? शेवटी तिचा मेकअपही शेखरची पत्नी अलका हिच्या मेकअप साहित्यानेच केला गेला.शेखरने माधुरीसाठी केला असणार म्हणा हा त्याग!