कपड्यांचा पसारा आवरायचा कसा?

    03-May-2024
Total Views |
 

cloths 
 
आपला नकाे तिथे खर्च कुठे हाेते याचा विचार बहुतेक गृहिणी नक्कीच करत असतात. त्यात पहिल्या क्रमांकावर असतील ते म्हणजे कपडे.घरातल जेवढे सदस्य असतील तेवढे कपडे.कपडे तर काय लागतातच म्हणून काेणत्याही निमित्ताने कपडे घेतले जातात आणि मग कपाट कपड्यांनी ओसंडून वाहायला लागायला वेळ लागत नाही. आता लाॅकडाऊन शिथील झाल्यावर कपड्यांसंदर्भात खालील काळजी घ्या.ड्रेससाठी कापड घेतल्यानंतर शिवायला देताना ते धुवून आणि इस्त्री करून मगच द्या.जरीच्या साड्यांमध्ये डांबरगाेळ्या ठेवताना त्या एखाद्या कापडात बांधून ठेवाव्यात. त्यामुळे साडी खराब हाेत नाही आणि त्यावर गाेळ्यांचे डागही पडत नाहीत.
 
इलॅस्टिक असलेले कपडे गरम पाण्यामध्ये बुडवू नयेत, त्यांचे इलॅस्टिक खराब हाेतं.सुती कपड्यांना इस्त्री करताना उलट बाजूनं करावी. त्यामुळे कपड्याचा रंग टिकून राहताे.भरतकाम केलेल्या कपड्याला इस्त्री करताना त्यावर पातळ कापड अंथरावं.सिल्कच्या कपड्यांना इस्त्री करताना त्यावर पेपर टाकावा. पांढरे कपडे धुवून झाल्यानंतर शेवटी बादलीमध्ये थाेडे पाणी घ्यावं, त्यात अर्धा लिंबू पिळावा आणि त्यामधून ते पांढरे कपडे एकदा बुडवून काढावेत. यामुळे पांढरे कपडे चमकदार दिसतात. पांढरे कपडे अधून-मधून साेडा घातलेल्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवावेत. ते स्वच्छ हाेतात.लहान मुलांचे कपडे फार मळले असतील, तर पाणी, साबण आणि साेडा यांच्यासह कुकरमध्ये घालून एक शिट्टी काढावी. हे कपडे भट्टीप्रमाणे स्वच्छ हाेतात.