चि. ओंकार : चि. सौ. कां. श्रेया
कर्वेनगर, 2 मे (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
पुण्याचे माजी महापौर श्री. दत्तात्रय बबनराव धनकवडे आणि श्रीमती विद्या यांचे सुपुत्र चि. ओंकार आणि नाशिकचे प्रतिष्ठित श्री. हरीश दत्तात्रय लोणारी आणि श्रीमती विजया यांची सुकन्या चि. सौ. कां. श्रेया यांच्या शुभविवाहानिमित्तचा स्वागत समारंभ डी.पी. रोड, कर्वेनगर येथील पंडित फार्म येथे मोठ्या थाटात पार पडला. नवदांपत्यास शुभाशीर्वाद देण्यासाठी पुणे आणि नाशिकच्या उद्योग, व्यापार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर मंडळी उपस्थित होती.