पाेस्टमनने उभारला दगडांचा राजवाडा

    29-May-2024
Total Views |
 
 

post 
 
फ्रान्सच्या Hauterivesया प्रांतात एका पाेस्टमनने दगडांतून उभारलेला राजवाडा हे पर्यटकांचे आकर्षण झाले आहे. फर्डिनांड शाव्हेल ((Ferdinand Cheval) या पाेस्टमनने त्याच्या दरराेजच्या 18 मैलांच्या (29 किलाेमीटर) पायपिटीतून गाेळा केलेल्या दगडांपासून हा राजवाडा तयार केला आहे. 1879 मध्ये फर्डिनांड पत्रे वाटण्यासाठी जात असताना त्याला वाटेत एक वेगळ्या आकाराचा दगड दिसला. ताे त्याने उचलला आणि मग असे दगड गाेळा करण्याचा छंद त्याने 33 वर्षे जाेपासला.या दगडांपासून 1912 मध्ये त्याने एक राजवाडा तयार केला.त्यात पुराणकथांमधील अनेक प्रसंग दिसतात.